सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये दिसणार शिंदेशाही थाट

saregamapa lil champs special episode
सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये दिसणार शिंदेशाही थाट

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील १४ निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. येत्या आठवड्यात या कार्यक्रमाची थीम असणार आहे शिंदेशाही. महाराष्ट्राला संगीत परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील एक सांगितीक घराणे ज्याला लोकसंगीतचा असाच वारसा लाभला आहे, ते म्हणजे ‘शिंदे घराणे’. हे १४ छोटे गायक शिंदे घराण्यातील गायकांची गाणी सादर करून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

प्रत्येक आठवड्यात या मंचावर पाहुणे कलाकार या लिटिल चॅम्प्सच कौतुक करण्यासाठी सज्ज होतात. या आठवड्यात शिंदेशाही ही थीम असल्यामुळे पाहुणे देखील खास असणार आहेत. आगामी भागात महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार सिद्धार्थ जाधव आणि लोकप्रिय संगीत दिग्दर्शक अमितराज लिटिल चॅम्प्सचं कौतुक करण्यासाठी सज्ज होणार आहेत. हे दोघे या मंचावर हजेरी लावणार म्हणजे कल्ला तर होणारच. सध्या लिटिल चॅम्प्स मधील काही स्पर्धक हे डेंजर झोन मध्ये असल्याने या डेंजर झोनमधून कोण बाहेर पडणार हे पाहणं औस्त्युक्याचं ठरेल.


हे हि वाचा – Big Boss Marathi: आंदोलनानंतर इंदुरीकर महाराजांची 80% किर्तने झाली डिलीट… तृप्ती देसाईने केला खुलासा