‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात कमावला इतक्या कोटींचा गल्ला!!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट 27 मे रोजी प्रदर्शित झाला. प्रवीण तरडेंची मुख्य भूमिका असलेला आणि त्यांनीच दिग्दर्शित केलेला सरसेनापती हंबीररावने सध्या मराठी चित्रपट सृष्टीत धूमाकुळ घालत आहे. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडलेली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. 27 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास 8.71 कोटींचा गल्ला जमवलेला आहे.

या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात 8.71 कोटींची कमाई केली आहे. प्रवीण तरडेंनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. “फक्तं तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास, फक्तं आणि फक्तं रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, असाच लोभ असुद्या सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा”. असं कॅप्शन दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात सरसेनापती असलेले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात प्रवीण तरडेंनी उत्तम भूमिका साकारलेली आहे.

याशिवाय मागील काही दिवसांपूर्वी प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘धर्मवीर’ चित्रपट सुद्धा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

 


हेही वाचा :कमल हासनच्या ‘Vikram’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कमावले 200 करोड