सर्वांना हसवणाऱ्या सतीश कौशिक यांच्या आयुष्यात होतं ‘हे’ मोठ्ठं दुःख

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी(8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात असून लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. आज त्यांच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका असा परिवार आहे.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से समोर येत आहेत. सर्वांना खळखळून हसवणारे सतीश कौशिक स्वतः मात्र नेहमी दुःखांचा सामना करत होते. 1985 मध्ये सतीश यांचे शशी कौशिक यांच्यासोबत लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र 1990 मध्ये सतीश यांचा 2 वर्षाचा मुलगा सानूचा मृत्यू झाला ज्यामुळे ते खूप खचून गेले. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कामाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. मात्र, त्यानंतर 2012 मध्ये मुलाच्या मृत्यूच्या 16 वर्षानंतर सरोगसीच्या मदतीने त्यांच्या घरी मुलीने जन्म घेतला.

कोरीमल कॉलेजमधून केलं होतं ग्रॅज्युएशन

सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण करोलबाग येथील शाळेत केले आणि नंतर 1972 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कोरेमल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. अभिनयाची आवड त्यांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये घेऊन गेली. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी ते एक अनुभवी थिएटर कलाकार होते.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये केले होते काम

Mr. & Mrs. Khiladi (1997)

1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याला दिग्दर्शनात हात आजमावण्याची संधी मिळाली आणि ‘जाने भी यारों’ या कल्ट चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. सतीश कौशिक ‘रूप की रानी चोरों का राजा’चे दिग्दर्शक होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच 1987 मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली.


हेही वाचा :

“ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते…” सतीश कौशिक यांच्या निधनावर कंगनाची भावूक पोस्ट