घरमनोरंजनसतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला रवाना; व्हिडीओ व्हायरल

सतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीहून मुंबईला रवाना; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी (8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, आता त्यांचे पार्थिव दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयातून अंत्यसंस्कारासाठी मुंबईत रवाना झालं असल्याची बातमी समोर येत आहे. तसेच दिल्लीतील रुग्णालयामधून सतीश यांना बाहेर आणतानाचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

सतीश कौशिक यांच्यावर आज (9 मार्च) संध्याकाळी 5 पर्यंत मुंबईतील वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. यावेळी त्यांचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधील मित्र उपस्शित राहतील. सतीश यांच्या निधनानंतर अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये केले होते काम

- Advertisement -

1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याला दिग्दर्शनात हात आजमावण्याची संधी मिळाली आणि ‘जाने भी यारों’ या कल्ट चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. सतीश कौशिक ‘रूप की रानी चोरों का राजा’चे दिग्दर्शक होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच 1987 मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली.

 


हेही वाचा :

“ते माझे सर्वात मोठे चीअरलीडर होते…” सतीश कौशिक यांच्या निधनावर कंगनाची भावूक पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -