घरमनोरंजनतुमचे संवेदनशील पत्र माझ्यासाठी... पंतप्रधानांच्या सांत्वन पत्राला सतीश कौशिक यांच्या पत्नीचे उत्तर

तुमचे संवेदनशील पत्र माझ्यासाठी… पंतप्रधानांच्या सांत्वन पत्राला सतीश कौशिक यांच्या पत्नीचे उत्तर

Subscribe

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे 9 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश यांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंबिय आणि मित्र-मैत्रिणी, चाहते खूप भावूक झाले आहेत. अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांना एक संदेश पत्र पाठवले आहे. जे सतीश कौशिक यांचे मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे.

अनुपम खेर यांनी शनिवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र शेअर केले आहे , जे त्यांनी दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या पत्नी शशी कौशिक यांच्यासाठी लिहिले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. या दु:खाच्या प्रसंगी तुमचे संवेदनशील पत्र माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी मलम म्हणून काम करत आहे! एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यावर देशाचे पंतप्रधान सांत्वन देतात, तेव्हा त्या दु:खाला सामोरे जाण्याचे बळ मिळते. माझ्या वतीने, आमची मुलगी वंशिका, आमचे संपूर्ण कुटुंब आणि सतीशजींच्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानते आणि तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. विनम्र! शशी कौशिक.”

- Advertisement -

सतिश कौशिक मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांचा तपास सुरु

दिल्ली पोलिसांनी सतिश कौशिक यांच्या मृत्यूमागे कोणाचा हात तर नाही ना याचाही तपास करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी पूर्ण दिवसात सतिश कौशिक यांच्यासोबत काय काय घडलं याची माहिती सध्या पोलिस मिळवत आहेत.
सतिश कौशिक यांच्या मॅनेजरने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत समोर आलं आहे की, ते बुधवारी रात्री 10:30 वाजता झोपायला निघून गेले होते. रात्री 12 नंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली.तेव्हा मॅनेजरला बोलावण्यात आलं होतं.


हेही वाचा  :

‘घर बंदूक बिरयानी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -