सतीश कौशिक यांच्या 12 वर्षीय मुलीने शेअर केला वडिलांसोबतचा फोटो; नेटकरी झाले भावूक

बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांचे बुधवारी(8 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली होती. सतिश कौशिक यांच्या निधनामुळे बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश कौशिक गुडगाव येथील एका फार्महाऊसवर गेले होते. तिथून परतत असताना त्यांना गाडीतच हृदयविकाराचा झटका आला होता. गुरुवारी (9 मार्च) संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांचे नातेवाईक तसेच अनेक बॉलिवूड कलाकारा उपस्थित होते. अनेकांनी सतीश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अशातच सतीश यांची 12 वर्षीय मुलगी वंशिकाने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लाडक्या वडीलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकजण भावूक झाले आहेत.

सतीश कौशिक यांच्या मुलीने शेअर केला फोटो

jagran

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची मुलगी वंशिकाने वडीलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात वंशिका आणि सतीश खूप खूष दिसत आहेत. या फोटोसोबतच तिने रेड हार्ट इमोजी देखील टाकली आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकजण फोटो पाहून भावूक झाले आहेत. तसेच अनेकजण तिचे सांत्वन देखील करत आहेत.

1990 मध्ये सतीश यांच्यावर कोसळला होता दुःखाचा डोंगर

1985 मध्ये सतीश यांचे शशी कौशिक यांच्यासोबत लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र 1990 मध्ये सतीश यांचा 2 वर्षाचा मुलगा सानूचा मृत्यू झाला ज्यामुळे ते खूप खचून गेले. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कामाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बराच वेळ लागला. मात्र, त्यानंतर 2012 मध्ये मुलाच्या मृत्यूच्या 16 वर्षानंतर सरोगसीच्या मदतीने त्यांच्या घरी मुलीने जन्म घेतला.

100 हून अधिक चित्रपटांमध्ये केले होते काम

1983 मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याला दिग्दर्शनात हात आजमावण्याची संधी मिळाली आणि ‘जाने भी यारों’ या कल्ट चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली. सतीश कौशिक ‘रूप की रानी चोरों का राजा’चे दिग्दर्शक होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच 1987 मध्ये मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळाली.

 


हेही वाचा :

आठवणीत राहील असा ‘कॅलेंडर’ आणि ‘पेजर’ !