घर मनोरंजन 'जे घडणार तेच ती बोलणार' सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लवकरच...

‘जे घडणार तेच ती बोलणार’ सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

नेत्राची रहस्यमय गोष्ट लवकरच झी मराठीवर(zee marathi) प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

सध्या मालिकांमध्येसुद्धा वेगवेगळ्या आशयांच्या मालिका येत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावरची मालिका लवकरच प्रेक्षसकांच्या भेटीला येणार आहे. आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी'(satvya mulichi satvi mulgi) मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठीवर(zee marathi) प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हे ही वाचा – अमृता खानविलकरचं फोटोशूट पाहून पती हिमांशूने दिली ‘ही’ प्रतिक्रिया तर…

- Advertisement -

सातव्या मुलीची सातवी मुलगी(satvya mulichi satvi mulgi) मालिकेतील नायिका नेत्राला भविष्यात काय घडणार हे दिसतं. त्यामुळेच गावातली सामान्य मुलगी असूनही ती असामान्य ठरलीय. नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत. 12 सप्टेंबरपासून 2022 रोजी ही मालिका झी मराठीवर प्रेकक्षांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

हे ही वाचा – भारती सिंहचा मुलगा झाला कृष्णा; व्हिडीओ व्हायरल

या मालिकेत तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर मालिकेची निर्मिती आयरिस प्रोडक्शन (विद्याधर पाठारे) यांनी केली आहे.

हे ही वाचा – गायक महेश काळे आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गायले ‘ ऐक्य मंत्र’ गाणे

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -