Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'सटवाई'तून उलगडणार नशिबाची नवी गोष्ट!

‘सटवाई’तून उलगडणार नशिबाची नवी गोष्ट!

Related Story

- Advertisement -

सटवाई जन्मतःच नशीब लिहून ठेवत असते. अशाच नशीबाची अनोखी गोष्ट ‘सटवाई’ या चित्रपटातून उलगडणार असून सुरज झांजगे निर्मित, दिनेश विजय शिरोडे दिग्दर्शित या चित्रपटाचं चित्रीकरण जानेवारी २०२१ मध्ये सुरू होत आहे. टॅगडॉग मीडिया आणि षष्ठीज फिल्म्स अँड एंटरटेन्मेंट यांनी ‘सटवाई’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. ‘जगातील सर्वांत सुंदर दिसणारी स्त्री’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्याचे पोस्टरवरून दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटात नक्कीच हटके कथा मांडली जाणार असे म्हणता येईल. स्वाभाविकपणे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

चित्रपटाची कथा, कलाकार आणि तंत्रज्ञ कोण हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र प्रेक्षकांसाठी या चित्रपटात काही सरप्राईज नक्कीच मिळतील. टप्प्याटप्प्याने या चित्रपटाचे अन्य तपशील जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक दिनेश विजय शिरोडे यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्र ठप्प झाले होते. पण आता पुन्हा एकदा चित्रपट, मालिका, वेबसीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात अनेक नवे चित्रपट, वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे.


हेही वाचा – सिद्धार्थ शहनाजला म्हणतोय ‘शोना शोना’


- Advertisement -

 

- Advertisement -