Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अनिता भाभीजीच्या घरी येणार नवा पाहुणा

अनिता भाभीजीच्या घरी येणार नवा पाहुणा

Subscribe

सौम्याच्या घरी लवकरच लहान बाळ येणार असून ही आनंदाची बातमी तिने आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावरून शेअर केली आहे.

‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्या टंडनकडे लवकरच नवा पाहुणा येणार आहे. सौम्या गेले कितीतरी वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. सौम्याच्या घरी लवकरच लहान बाळ येणार असून ही आनंदाची बातमी तिने आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावरून शेअर केली आहे. ही अतिशय सुंदर भावना असल्याचं सौम्यानं सांगितलं आहे. टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेने सौम्याला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. अनिता भाभी साकारणाऱ्या सौम्याने आपली ही सर्वात आनंदाची गोष्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. स्वतःचा फोटो पोस्ट करत उठल्यानंतर आता विनाटोपीचा सुपरहिरो असल्याचं रोज वाटत असल्याचं सांगितलं आहे.

काय आहेत सौम्याच्या भावना?

- Advertisement -

सौम्याने आपले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्याला नक्की याविषयी काय भावना आहेत ते व्यक्त केले आहे. ‘विनाटोपीच्या सुपरहिरोसारखं वाटत असून रोज सकाळी एक जादूगार असल्याची भावना जागृत होते. आशीर्वाद आणि देवाच्या भक्तीची मला जाणीव होत आहे. हार्मोन्समध्ये सतत बदल होत आहेत पण सध्या मी खूपच उत्साहित आहे. सर्वात मोठी बातमी – मी गरोदर आहे आणि प्रत्येक क्षण मजेत घालवण्याच्या प्रयत्नात आहे. तुमच्या शुभेच्छांची गरज आहे,’ अशी कॅप्शन तिने लिहिली आहे. टीव्हीवरील या मालिकेने सौम्याला सर्व काही दिले. सौम्या गेली बरेच वर्ष छोट्या पडद्यावर काम करत आहे. मात्र तिला खरी ओळख दिली ती ‘अनिता भाभी’ या व्यक्तिरेखेने. ‘जब व्ही मेट’मध्ये करीना कपूरच्या बहिणीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सौम्याने २०१६ मध्ये बँकर सौरभ सिंहबरोबर लग्न केले होते. आता लवकरच सौम्याकडून आनंदाची बातमी येईल.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -