समंथा-चैतन्य यांच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

समंथा-चैतन्य यांच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्यसोबत नुकताच घटस्फोट घेतला. या बातमीने सर्वच चाहत्यांमध्ये नाराजी दिसली. यावरच नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य आणि सून समंथा यांच्या तुटलेल्या नात्यासंदर्भात साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली आहे. असे सांगितले जात आहे की, समंथा-चैतन्य यांच्या विवाहाला चार वर्ष झाले आणि चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आहे. दोघांनीदेखील ही माहिती आपल्या सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांनी दिली. त्याचबरोबर नागार्जुन यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करून या संदर्भात दुःख व्यक्त केले आहे.

अशी दिली नागार्जुनने प्रतिक्रिया

मोठ्या जड अंतःकरणाने मी ही पोस्ट लिहित आहे. सॅम आणि चाय यांच्यात जे काही घडले ते दुर्दैवी होते. पती -पत्नीमध्ये जे काही घडते ते पूर्णतः वैयक्तिक असते. सॅम आणि चाय दोघेही माझ्या खूप जवळ आहेत. माझे कुटुंब सर्वांना आनंदात ठेवेल. सॅमसोबत घालवलेले क्षण आणि त्यामुळे ती नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ राहील, अशी प्रतिक्रिया नागार्जून यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

दोघांनी सोशल मीडियावर असे लिहिले की, “खूप विचार करून त्यानंतर, मी आणि चैतन्यने पती -पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही भाग्यवान आहोत की आमची बरीच जुनी मैत्री असून जो आमच्या नात्यांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, ही मैत्री आमच्यामध्ये कायम राहिल”

त्यापुढे त्यांनी असेही सांगितले की, आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना गेखील आवाहन करतो की, या कठीण काळात आम्हाला पाठिंबा द्यावा. तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी आम्हाला थोडी प्रायव्हसी द्यावी. तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. २०१७ मध्ये, सामंथा आणि नागा चैतन्य यांनी धूमधडाक्याने लग्न केले होते. सामंथा आणि नागा या सुपरहिट जोडीच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप निराशा झाली आहे. चाहत्यांना त्यांची जोडी रिअल आणि रील दोन्हीमध्ये खूप भावली. अशा स्थितीत या दोघांच्या वेगळेपणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोघे २०१० मध्ये ये माया चेसावे चित्रपटात पहिल्यांदा एकाच पडद्यावर अभिनय करताना दिसले होते. या दोघांच्या जोडीला चाहत्यांना सर्वाधिक पसंती मिळत असून दक्षिण भारतीय मनोरंजन विश्वात क्यूट जोडी आहे.