Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनSavalyachi Janu Savali : तारा- सोहमला मदत केल्याने सावली सारंगपासून दुरावणार?

Savalyachi Janu Savali : तारा- सोहमला मदत केल्याने सावली सारंगपासून दुरावणार?

Subscribe

झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतेय. या मालिकेतून अभिनेत्री प्राप्ती रेडकर (सावली) आणि अभिनेता साईकित कामत (सारंग) ही नवी जोडी समोर आली. मालिकेतील कलाकारांचा अभिनय आणि मालिकेचं कथानक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलंय. हळूहळू प्रेक्षकांच्या घरात आणि मनामनांत मालिकेतील सावलीने पक्के स्थान केले आहे. दरम्यान, मालिकेत एकामागे एक येणारे ट्विस्ट आता मालिकेचं कथानक आणखी रंजक बनवत आहे. (Savalyachi Janu Savali update savali sarang relationship in trouble due to tara soham)

सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत सावली सारंगसाठी व्रत ठेवण्याचा निर्णय घेते. ऐश्वर्याच्या हे लक्षात येतं. ज्यामुळे समोर असलेल्या संधीचा फायदा घेऊन ती सावलीला अपमानित करण्याचा आणि तिचा व्रत तोडण्याचा प्रयत्न करते. ती संपूर्ण कुटुंबासमोर सावलीला कमी लेखण्याचा प्रयत्न करते. पण ऐश्वर्याच्या मनसुब्यांसमोर सावली अगदी ठाम उभी राहिली आहे. दरम्यान, सारंग घरी परतताना त्याच्यासोबत एक लहानसा अपघात घडतो आणि ज्यामुळे सर्वजण चिंतेत पडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

यावेळी सावली त्याच्या मदतीसाठी धावत येते. सारंग सावलीच्या या स्वभावाने प्रभावित होतो आणि तिच्याकडे एका नव्या दृष्टीने पहायला सुरुवात करतो. या सगळ्यात तिलोत्तमा सोहमसाठी मुलगी पाहतेय. पण सोहमचं तारावर प्रेम आहे. तारा सावलीकडे हा साखरपुडा थांबवण्यासाठी मदत मागते. सावली साखरपुडा तोडण्यासाठी मार्ग शोधायला लागते. पण तिच्या या प्रयत्नांमुळे घरात तणाव निर्माण होतो आणि या सगळ्यामुळे सारंग आणि सावलीच्या संबंधात पुन्हा एकदा अंतर येताना दिसतंय. आता तारा सोहमला मदत करण्याच्या विचार सावली मागे घेईल? की सारंगसोबतचं आपलं नातं सुधारेल? हे जाणून घेण्यासाठी ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचे पुढील भाग पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Me Pathishi Aahe Movie : नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी गाथा