‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. सध्या या मालिकेत चालू असलेला ट्रॅक पाहता लवकरच प्रेक्षकांचे लाडके सावली आणि सारंग एकत्र येतील अशी आशा आहे. मालिकेत नुकताच सारंग हॉस्पिटलमधून घरी परतल्याने दाखवण्यात आले आहे. तर सावलीला एका संगीत स्पर्धेची माहिती मिळाल्याचे दाखवले आहे. या स्पर्धेत उतरण्यासाठी सावलीला सरावाची गरज आहे. पण एकीकडे सारंगची काळजी घेताना दुसरीकडे सराव करणे तिच्यासाठी तारेवरची कसरत ठरतंय. (Savlyachi Janu Savali upcoming episodes will be based on the Holi festival)
गायनाचा सराव करताना सावलीसाठी सारंगची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. अशावेळी ऐश्वर्या सावलीला सारंगसंबंधीत अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतेय. पण पहिल्यांदाच सावली ऐश्वर्याविरुद्ध मेहेंदळे कुटुंबासमोर ठामपणे उभी राहताना दिसणार आहे. जे पाहून प्रेक्षकांना मोठा आनंद होईल. सारंग बरा होत असतानाच सावलीला त्याच्याप्रती असलेल्या काळजीसाठी तो वैयक्तिकरित्या तिचे आभार मानतो. सारंग सखदेवला मदतीचा हात पुढे करतो पण सावली आणि सखदेव दोघेही यासाठी नकार देतात.
सध्या मालिकेत होळीचा ट्रॅक दाखवला जाईल. त्याप्रमाणे तिलोत्तमा होळीसाठी तारा आणि भैरवीला आमंत्रित करते. होळीच्या दिवशी सावलीला, तारा आणि सोहम एकमेकांना मिठी मारताना दिसतात. त्याच क्षणी तारा आणि सोहम सावलीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देतात. त्यामुळे आता सावली मनापासून तारा आणि सोहमच्या नात्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. दरम्यान, सारंग- सावलीला महापूजेच्या विधीसाठी बोलावतो. सावली महापूजेचे सगळे विधी पार पाडते. पण हा त्यांचा आनंद अल्पकाळ टिकणारा ठरतो. ऐश्वर्याला अस्मीचा फोन येतो आणि त्याच वेळी जगन्नाथला गुंडांकडून धक्कादायक बातमी मिळते. आता ही बातमी सावलीला काय धक्का देणार? रंगांचा सण होळी सारंग- सावलीच्या नात्यात प्रेमाचे रंग भरणार का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी एपिसोड पाहावे लागणार आहेत.
हेही पहा –
Mahesh Manjrekar : रंगभूमीवर दरवळणार महेश मांजरेकरांची फिल्टर कॉफी