सायली संजीव ही मराठी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी मालिका तसेच चित्रपटांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो, व्हिडीओ शेअर करून ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. नुकतीच तिने सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाउंडेशन’च्या आश्रमाला भेट दिली आहे. हे आश्रम कोईम्बतूरमध्ये आहे. या आश्रमातील अनुभव शेअर करताना तिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. (Sayali Sanjeev shared her divine experience in Sadhgurus ashram)
सद्गुरुंच्या आश्रमाला सायली संजीवची भेट
अभिनेत्री सायली संजीवने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सद्गुरुंच्या आश्रमातील अनुभव सांगितला आहे. यावेळी तिने 11 फोटो आणि 4 व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने ‘आदियोगी शिवा स्टॅच्यू’सोबत क्लिक केलेला फोटो शेअर केला आहे. जो सर्वाधिक व्हायरल होताना दिसतोय. याशिवाय तिने आश्रमातील विविध भागांचे फोटो तसेच व्हिडीओ शेअर केले आहेत. यासोबत कॅप्शन लिहीत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
सायलीने या पोस्टसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘आश्रमात राहणे अद्भुत होते, त्याचे वर्णन शब्दात करणे कठिण आहे. माझे मन आनंदी भावनांनी भरुन गेले आहे. आपण दिलेल्या सर्व प्रेमासाठी कौतुकासाठी आणि या दिवसांसाठी मी खूप कृतज्ञ आहे. खूप खूप धन्यवाद’. ही पोस्ट अभिनेत्रीने ‘सद्गुरू जग्गी वासुदेव’ आणि ‘ईशा फाऊंडेशन’ यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हॅण्डल्सला टॅग केली आहे. दरम्यान, तिने आश्रमातील सैर केलेले तसेच वेगवेगळ्या पोज दिलेले हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहेत.
काळी साडी, नो मेकअप लूक
अभिनेत्री सायली संजीवने आश्रमातील हे सुंदर क्षण जगतेवेळी अत्यंत साधा पेहराव केला होता. सोनेरी काठ आणि डॉट असलेली काळी साडी, बांधलेले केस, कपाळावर टिकली असा तिचा साधासा लूक फारच भावणारा आहे. मुख्य म्हणजे, यावेळी तिने कोणत्याही प्रकारचा मेकअप केला नव्हता. त्यामुळे तिने शेअर केलेला हा नो मेकअप लूक आणखीच चर्चेत आला आहे. शिवाय तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये गणेशाची एक सुंदर दगडी मूर्ती दिसत आहे. जी पाहून मन अगदी प्रफुल्लित होईल.
सायली संजीवच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली. यानंतर तिने ‘परफेक्ट पती’, ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकांमध्ये देखील काम केले. केवळ मालिकाच नव्हे तर काही चित्रपटांमध्येही तिने मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. ज्यामध्ये ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा 2’, ‘ओले आले’, ‘बस्ता’, ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटांचा समावेश आहे. येत्या काळात तिचे ‘समसारा’ आणि ‘कैरी’ असे दोन चित्रपट येणार आहेत. त्यासोबत तिची ‘निमा’ ही शॉर्टफिल्म देखील येणार आहे.
हेही पहा –
Shefali Jariwala : कांटा गर्लचा पतीसोबत खुलेआम रोमांस, VIDEO पाहून नेटकऱ्यांनी काढले वाभाडे