मला पुरुषांची गरज नाही…असं म्हणत ‘या’ अभिनेत्रीने केलं स्वतःशीच लग्न

सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत कनिष्काने खाली भलं मोठ्ठ कॅप्शन देखील लिहिलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, "मी स्वताःशी लग्न केलं कारण, मी माझी सर्व स्पप्न पूर्ण केली आणि मी एकमेव व्यक्ती आहे, जिच्यावर माझं खूप प्रेम आहे.

मागील काही दिवसांपूर्वी गुजरात मधील एका तरूणीने स्वतःशीच लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केल होतं. दरम्यान, आता अशीच एक बातमी हिंदी टेलिव्हिजनमधूल समोर आली आहे. हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री कनिष्का सोनी हिने देखील हे धाडसी आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे.

कनिष्का सोनीने केलं स्वताःशी लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by Kanishka Soni (@itskanishkasoni)

कनिष्का सोनीने आत्तापर्यंत दीया और बाती हम, पवित्र रिश्ता, देवी आदि पराशक्ति यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वताःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कनिष्काने गळ्यात मंगळसूत्र आणि भांगामध्ये कुंकू लावल्याचं दिसत आहे. तसेच तिने हा फोटो शेअर करत स्वताःशी लग्न केल्याचा खुलासा केला आहे.

मला पुरूषांची गरज नाही…
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत कनिष्काने खाली भलं मोठ्ठ कॅप्शन देखील लिहिलं आहे. ज्यामध्ये तिने लिहिलंय की, “मी स्वताःशी लग्न केलं कारण, मी माझी सर्व स्पप्न पूर्ण केली आणि मी एकमेव व्यक्ती आहे, जिच्यावर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळे माझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे की, मी फक्त स्वताःवर प्रेम करते. मला कोणत्याही पुरूषाची गरज नाही… मी नेहमी खूश आहे… एकटी आहे माझ्या एकांतामध्ये माझं गिटार माझ्यासोबत आहे. मी एक देवी आहे, जी खूप शक्तिशाली आणि मजबूत आहे. शिव आणि शक्ति सर्वकाही माझ्यातच आहे धन्यवाद”


हेही वाचा : बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटाची माफक फी घ्यावी; भाजपा नेत्याचा सल्ला