Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Raavan Leela Trailer: प्रतिक गांधी 'रावण लीला'मध्ये दिसणार रोमँटिक अंदाजात; पाहा ट्रेलर

Raavan Leela Trailer: प्रतिक गांधी ‘रावण लीला’मध्ये दिसणार रोमँटिक अंदाजात; पाहा ट्रेलर

Related Story

- Advertisement -

अभिनेता प्रतिक गांधीचा बहुचर्चित चित्रपट ‘रावण लीला (भावई)’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच काळापासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. तसेच प्रतिक गांधीचे चाहते ‘रावण लीला’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज ‘रावण लीला’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर याची चांगली चर्चा सुरू आहे. पेन इंडियाने आपल्या अधिकृत युट्यूब अकाऊंटवरून ‘रावण लीला’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटामध्ये प्रतिक गांधीसोबत अभिनेत्री ऐंद्रिता रे, अंकुर भाटिया, अभिमन्यु सिंह, राजेश शर्मा, अंकुर विकल, राजेंद्र गुप्ता, गोपाल सिंह, फ्लोरा सैनी, अनिल रस्तोगी, कृष्णा बिष्ट आणि भाग्यश्री मोटेसह इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ‘रावण लीला’ ट्रेलरमध्ये प्रतिक गांधी रोमँटिक अंदाजात दिसत आहे. तसेच चित्रपटात ऐंद्रितासोबत रोमान्स करताना प्रतिक दिसणार आहे.

- Advertisement -

‘रावण लीला’ चित्रपटामध्ये एक वेगळ्या प्रकारची प्रेम कहानी पाहायला मिळणार आहे. ट्रेलरसोबत या चित्रपटाची प्रदर्शनाच्या तारखेचा खुलासा झाला आहे. येत्या १ ऑक्टोबरला चित्रपटगृहात ‘रावण लीला’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जरने केले आहे. प्रतिक गांधी यापूर्वी गुजराती आणि हिंदी चित्रपटात दिसला आहे. परंतु प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच प्रतिक ‘रावण लीला’मध्ये दिसणार आहे. त्यामुळे प्रतिक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्या महिन्यात ‘रावण लीला’चा पहिला लूक प्रदर्शित झाला होता. पोस्टरमध्ये प्रतिकने आपल्या हिरोईन ऐंद्रितासोबत बासरी वाजवतानाची पोझ दिली होती. ऐंद्रिता प्रतिकप्रमाणे पहिल्यांदा हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

पाहा ‘रावण लीला’चा ट्रेलर

- Advertisement -


हेही वाचा – Javed Akhtar: कंगना रनौतला मुंबई हायकोर्टाचा मोठा दणका


 

- Advertisement -