घरमनोरंजनबिग बी-तापसीचा 'बदला', दुसरं पोस्टर रिलीज

बिग बी-तापसीचा ‘बदला’, दुसरं पोस्टर रिलीज

Subscribe

येत्या ८ मार्च रोजी अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूचा 'बदला' हा चित्रपट रिलीज होणार आहे.

‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या ‘बदला’ या आगामी चित्रपटाचा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. ‘पिंक’ चित्रपटानंर अमिताभ आणि तापसी पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्यामुळे, या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. दरम्यान, ‘बदला’ चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर जोरदार व्हायरल होत असून, यामधील तापसी आणि अमिताभच्या लूकची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरवरील चारोळीही सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. ‘माफ कर देना हर बार सही नही होता’ या ओळी विशेष आकर्षण ठरत आहेत. याचं कारण म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवरही या ओळी होत्या. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे नवं पोस्टर त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केलं आहे.

‘बदला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजय घोष यांनी केलं असून, या चित्रपटाची निर्मिती गौरी खान, सुनिर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी केली आहे. दिग्दर्शक  सुजय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बदला’मध्ये प्रेक्षकांना कलाकारांचा दमदार संवाद, रहस्य आणि सस्पेन्स थ्रिलर याची उत्तम सांगड पाहायला मिळणार आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर प्रत्यक्षात हा चित्रपट काय कमाल दाखवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -