‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ वेबसिरीज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज

या आधी व्हीमास मराठीच्या 'राडा राडा' या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आता त्यांची 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे.

ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटीविश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचा कॉकटेल घेऊन ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ ही नवीकोरी वेबसिरीज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे.’चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट’ निर्मित आणि ‘व्हीमास मराठी’ प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ऍक्शनचा भरणा असलेली वेबसिरीज लवकरच ‘व्हीमास मराठी’ या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या आधी व्हीमास मराठीच्या ‘राडा राडा’ या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आता त्यांची ‘सिक्रेट ऑफ गावस्कर’ ही वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. नुकताच या वेबसिरीजचा भयावह ट्रेलर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची जादू या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव नक्कीच घेईल यांत शंकाच नाही. लेखक अजिंक्य ठाकूर लिखित ही वेबसिरीज असून याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरीत्या साकारली आहे. तर क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलवली आहे.


हेही वाचा :‘कभी ईद कभी दिवाली’मधून शहनाज गिलची हकालपट्टी? शहनाजने दिली प्रतिक्रिया म्हणाली…