Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन जान्हवी कपूरचं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना आली स्मिता पाटील यांची आठवण

जान्हवी कपूरचं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना आली स्मिता पाटील यांची आठवण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सतत विविध कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जान्हवीचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटांसोबतच जान्हवी अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अशातच जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर तिच्या एका सुंदर लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून अनेकांना दिवगंत अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण येत आहे. नेटकऱ्यांच्या मते, या फोटोमध्ये जान्हवी हुबेहुब स्मिता पाटील यांच्यासारखीच दिसत आहे.

सोशल मीडियावर जान्हवीच्या नव्या फोटोशूटची चर्चा

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जान्हवी तिचे अनेक नवनवीन फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करते. कधी पारंपारिक तर कधी बोल्ड अश्या विविध लूकमधील जान्हवीचे फोटो पाहून चाहते तिचं कौतुक करत असतात. अशातच जान्हवीने नुकतेच एका सुंदर लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून अनेकांना दिवगंत अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण येत आहे.

- Advertisement -

जागरण

हे शेअर केलेले फोटो ब्लॉक अॅण्ड व्हाईट आहेत. शिवाय यात जान्हवीने साडी नेसली असली तरी त्यावर ब्लाऊज घातलेला नाही.

नेटकऱ्यांना आली स्मिता पाटील यांची आठवण

- Advertisement -

Smita Patil 32nd Death Anniversary: Raj Babbar and Prateik share  heartwarming posts - The Statesman

जान्हवीचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांना दिवगंत अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण येत आहे. त्या देखील अशाच दिसायच्या असं अनेकांचे म्हणणं आहे. तसेच काहींना स्मिता पाटील यांच्या बायोपिकमध्ये जान्हवी नक्कीच भूमिका साकारु शकेल असं म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या जान्हवी ‘NTR 30’ व्यतिरिक्त अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. ती वरुण धवनसोबत ‘बावल’मध्ये दिसणार आहे. जान्हवी याआधी मल्याळम चित्रपट ‘हेलन’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘मिली’मध्ये दिसली होती, दोन्ही मथुकुट्टी झेवियर दिग्दर्शित होते, तर चित्रपटाची निर्मिती जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी केली होती.


हेही वाचा :

रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ने जिंकली प्रेक्षकांची मनं; कमावले ‘इतके’ कोटी

- Advertisment -