राहूल गांधींना रिसेप्शन पार्टीमध्ये पाहून, नेटकऱ्यांनी केलं स्वरा भास्करला ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्वरा आणि फहादने कोर्ट मॅरेज अनेकांना सुखद धक्का दिला होता. आता त्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबिय आणि मित्रांच्या उपस्थित धुमधडाक्यात लग्न केलं. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच आता स्वराच्या रिसेप्शनचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

गुरुवारी रात्री स्वरा आणि फहाद यांचे रिसेप्शन दिल्लीमध्ये पार पडलं. यावेळी राहुल गांधी देखील उपस्थित राहिले होते. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये राहुल गांधी पूर्ण सिक्युरिटीसोबत या कार्यक्रमात जाताना दिसत आहेत. शिवाय स्वरा आणि फहादसोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत.

स्वरा भास्कर झाली ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, राहूल गांधींना रिसेप्शनमध्ये पोहोचलेलं पाहून सोशल मीडियावर नेटकरी स्वराला ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय की, ‘तुकडे तुकडे गँगचे लोक आले आहेत.’ तर दुसऱ्याने लिहिलंय की, यातून यांचे शाहीनबाग आणि जेएनयूला पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे.

कोण आहे फहाद अहमद?

स्वरा भास्करने काही दिवसांपूर्वी फहाद जिरार अहमदसोबत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज केलं. स्वराचा पती तिच्या पेक्षा वयाने 4 वर्षांपेक्षा लहान आहे. तिचा पती समाजवादी पक्षाचा नेता आहे. त्यांची पहिली भेट 2019 मध्ये झालेल्या आंदोलनात झाली. तिथेच त्यांची चांगली ओळख झाली. पुढे हळूहळू मैत्री, त्यानंतर प्रेम आणि आता त्याचे रुपांतर लग्नात झाले आहे.


हेही वाचा :

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच