शुभमनला पाहून चाहत्यांनी साराच्या नावाने चिडवलं; पण सारा नक्की कोणती?

भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींच्या रिलेशनशिपची चर्चा सोशल मीडियावर सतत सुरु असते. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्रींच क्रिकेटर्ससोबत लग्न देखील झालं. सध्या एकीकडे उर्वर्शी रौतेला आणि ऋषभ पंतच्या नावाची सतत चर्चा असते तर दुसरीकडे शुभमन गिल आणि सारा यांच्या नावाची चर्चा सुरु असते. परंतु ही सारा नक्की कोणती? याचा अनेकांना प्रश्न पडला आहे. सोशल मीडियावर काही नेटकरी शुभमनचं नाव सारा अली खानसोबत जोडत आहेत. तर काहीजण शुभमनचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडत आहेत. मात्र, या दोघींपैकी शुभमन नक्की कोणाला डेट करतोय? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. अशातच एका क्रिकेट मॅचमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात शुभमनचे चाहते त्याला पाहून ‘सारा, सारा’ अशी घोषणा देत आहेत.

सध्या क्रिकेट मॅचमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शुभमनला पाहून त्याचे चाहते ‘सारा, सारा’ अशी घोषणा देत आहेत. सोबतच या व्हिडीओवर ‘सारा तेंडुलकर की सारा अली खान? असं लिहून शुभमनला टॅग करण्यात आलं आहे.

शुभमन आणि सारा अली खान अनेकदा एकत्र
अभिनेत्री सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. शिवाय काही महिन्यांपूर्वी एका शुभमनला एका मुलाखतीमध्ये ‘बॉलिवूडमधील तुझी सर्वात आवडती अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्याने पटकन साराचे नाव घेतले. त्यानंतर त्याला, ‘तू साराला डेट करतोय का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत शुभमन म्हणाला, ‘सारा का सारा सच बोल दिया. कदाचित हो कदाचित नाही.’ शुभमनच्या या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले.


हेही वाचा :

ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी प्रियंका ठरली पहिली भारतीय अभिनेत्री