घरमनोरंजनअरबाज-शूराचं बॉन्डिंग पाहून युझर्सला येतेय मलायकाची आठवण

अरबाज-शूराचं बॉन्डिंग पाहून युझर्सला येतेय मलायकाची आठवण

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान 24 डिसेंबर 2023 रोजी शूरा खानसोबत विवाह बंधनात अडकला होता. अरबाज आणि शूराचं लग्नाझाल्यापासून ते दोघेही सतत चर्चेत असतात. पापराझी अनेकदा त्यांना स्पॉट करतात. दरम्यान, नुकताच अरबाज आणि शूराचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अरबाज गर्दीतून आपल्या पत्नीचं संरक्षण करताना दिसत आहे.

अरबाज-शूराचं नेटकरी करतायत कौतुक

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सध्या सोशल मीडियावर अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात सुरुवातीला ते दोघेही इफ्तार पार्टीमध्ये गेल्याचे दिसत आहेत. यावेळी ते अरबाज स्वतःच्या हाताने शूराला जेवण वाढतो. त्यानंतर शूरा देखील तिच्या ताटातील एक पदार्थ अरबाजला देते. या दोघांचं हे क्यूट बॉन्डिंगचं अनेकजण कौतुक करत आहेत. तसेच काहीजण शूराची तुलना मलायकाशी करताना दिसत आहेत. तसेच पुढच्या व्हिडीओत अरबाज शूराचे गर्दीत संरक्षण करताना दिसतो. अरबाजची ही शूराबद्दलची काळजी पाहून युझर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

- Advertisement -

कोण आहे शूरा खान?

अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करते. अरबाज आणि शूराची पहिली भेट अरबाजच्या आगामी ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले होते.

मलायकासोबत झालं होतं पहिलं लग्न

मलायका आणि अरबाज खानचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. 19 वर्षानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज अनेकदा मुलासोबत एकत्र दिसून येतात. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहेत.


हेही वाचा : Aryan Khan: आर्यन खान करतोय या हिरोईनला डेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -