घरमनोरंजनअफगाणिस्तानची परिस्थिती पाहून रिया चक्रवर्ती म्हणाली, या कृती विरोधात आवाज उठवा...

अफगाणिस्तानची परिस्थिती पाहून रिया चक्रवर्ती म्हणाली, या कृती विरोधात आवाज उठवा…

Subscribe

सध्या अफगाणिस्तान (afghanistan) आणि तालिबानमध्ये (taliban) मोठा संघर्ष सुरू आहे. यानंतर तालिबान महिलांवर अत्याचार करत असल्याच्या बातम्या तुफान वेगाने पसरत आहेत. यामुळे संपुर्ण जगामध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणिस्तानमधील  भीषण परिस्थिती पाहून आता बॉलिवूड कलाकारांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी या विरोधात आवाज उठवला आहे. तसेच अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (rhea chakraborty)तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत अफगाणि महिलांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत एक भली मोठी इंस्टा स्टोरी लिहली आहे. रियाने स्टोरीमध्ये लिहलं आहे की, एकीकडे संपुर्ण जग महिलांना समान वेतन मिळावं यासाठी लढत आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमध्ये त्यांना विकण्यात येत आहे. त्या महिला स्वत: एक पगार होत आहेत. अफगाणिस्तान मधील महिलांची आणि अल्पसंख्याची स्थिती पाहून हृद पिळवटत आहे. मी जगातील नेत्यांजवळ एक मागणी करत आहे या कृती विरोधात आवाज उठवा, पितृसत्ताकचा नाश होवो. महिलासुद्धा माणूस आहे. (Seeing the situation in Afghanistan and taliban, rhea chakraborty said, raise your voice against this action …)

- Advertisement -

अभिनेत्री सोनी राजदान यांनी सुद्धा ट्विट करत दु: ख व्यक्त केलं आहे.” जेव्हा एक देश स्वातंत्रता दिवस साजरा करत आहे. तर दुसरा देश त्यांची स्वतंत्रता गमावत आहेत. ”

दिग्दर्शक शेखर कपूर यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत लिहलं आहे की, मी अफगाणिस्तानच्या लोकांसाठी खास प्रार्थना करतोय. एक राष्ट्र विदेशी शक्तींच्या महत्वकांक्षापुढे नष्ट झाले आहेत.”

- Advertisement -

अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच तिचे मत सोशल मीडियावर रोखठोक मांडताना दिसते आजही स्वराने आफगाणिस्तान मधील परिस्थितीवर भाष्य करणारे एक ट्विट पोस्ट केलं आहे. “भित्तिचित्र कलाकार शमशिया हसानी हे सर्व सांगत आहे! अफगाण लोक लांडग्यांकडे फेकले गेले आहेत. विशेषत: महिला. तालिबान क्रूर राक्षसी आहेत. ते मारेकरी आणि गैरसमजवादी आहेत; त्यांची विचारधारा द्वेष आणि हिंसा आहे आणि ती बदलणार नाही.”


हे हि वाचा – शिल्पा आणि राज कुंद्राच्या उपद्व्यापामुळे शमिता शेट्टीला होतोयं ताप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -