मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. आजही त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. सीमा देव यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. सीमा देव मागील तीन वर्षापासून अल्झायमर (स्मृतीभंश) या आजाराने पीडित होत्या. आज सकाळी झोपेतच त्यांचे निधन झाले. रमेश देव यांना जाऊन जेथे दीड वर्ष देखील झाले नाही. तेथे सीमा देव यांच्या जाण्याने देव कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे.
अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेल्या सीमा देव यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. यांपैकी बरेच चित्रपट सुपरहिट देखील झाले होते.
1957 मध्ये त्यांनी ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर फक्त मराठी सिनेमांमध्येच काम न करता त्यांनी हिंदीमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली.
मराठीमधील त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या. परंतु ‘कशी झोकात चालली कोळ्याची पोर, जशी चवथीच्या चंद्राची कोर’ या त्यांच्या गाण्याला सिनेरसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले.
सीमा देव यांचा बॉलिवूडमध्येही ठसा
सीमा देव यांनी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत चित्रपटांमध्ये काम केले होते. मीनाकुमारी, अनिल कपूर, गोविंदा, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यासह काम करत बॉलिवूडमध्येही ठसा उमटवला.
त्यांचे मराठी मध्ये ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले.
तर हिंदीमध्ये त्यांचे ‘भाभी की चूडियाँ’, ‘आँचल’, ‘आनंद’, ‘प्रेमपत्र’, ‘मियाँ बीबी राजी’, ‘तकदीर’, ‘हथकडी’, ‘मर्द’ हे चित्रपट देखील सुपरहिट झाले होते.
हेही वाचा :