घरमनोरंजनधर्मेंद्र यांच्या स्टाफमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

धर्मेंद्र यांच्या स्टाफमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

धर्मेंद्र यांनी पूर्वकाळजी म्हणून कोरोनाची लस घेतली.

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. तसेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांना कोरोनाने विळखा घातला असून, जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या घरापर्यंत कोरोनाची एंट्री झाली आहे. धर्मेंद्र यांच्या स्टाफमधील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण बॉलीवूड क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. याअगोदरही अनेक बॉलीवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. धर्मेंद्र यांच्या जुहू बंगल्यावरील स्टाफना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच देओल कुटू्ंबिय सतर्क झाले आहे. याशिवाय कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित आयसोलेट करण्यात आले आहे. याशिवाय, धर्मेंद्र यांनी पूर्वकाळजी म्हणून कोरोनाची लस घेतली असून ते मुंबईत आले आहेत. धर्मेंद्र नेहमी लोणावळ्यातील फार्महाऊसवर मुक्कामाला असतात.

- Advertisement -

धर्मेंद्र यांनी लसीकरणाचा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘ट्विट करते करते जोश आ गया और मैं निकल गया व्हॅक्सीन लेने….’, असे लिहिले आहे. तसेच त्यांनी सर्वांना काळजी घ्यायचे आवाहन दिले आहे. याशिवाय अमिर खान आणि कार्तिक आर्यनलाही कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आमिर खानची पानी फाउंडेशन या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. त्यामुळे अलिकडच्या काळात संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करावी, असे आवाहन आमिर खान याने दिले आहे.


हेही वाचा – सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदी संजना सावंत यांची वर्णी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -