घरमनोरंजनज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन

Subscribe

तबस्सुम यांनी दीर्घकाळ बॉलिवूडमध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 78 व्या वर्षीनिधन झाले. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोसाठी त्या लोकप्रिय होत्या. 21 नोव्हेंबर रोजी आर्य समाज, लिंकिंग रोड, सांताक्रूझ येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

अभिनयासोबत या क्षेत्रातही नाव कमावले
तबस्सुम यांनी दीर्घकाळ बॉलिवूडमध्ये काम केले आहे. त्या एक उत्तम अभिनेत्री होत्या. पण त्यासोबतच त्यांनी टॉक शो देखील होस्ट केले आहेत, त्यांनी चित्रपट, टीव्ही, रेडिओ आणि वेब या चारही माध्यमांमध्ये काम केले आहे. त्या कथा सांगण्यासाठीही प्रसिद्ध होत्या. सध्या त्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवर खूप सक्रिय होत्या या माध्यमातून त्या बॉलिवूडच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांना सांगायच्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karishma Govil (@soul_kari)

- Advertisement -

तबस्सुम अरुण गोविल यांच्या वहिनी होत्या
तबस्सुम या स्वतः एक अभिनेत्री होत्या आणि ती छोट्या पडद्यावरील राम म्हणजेच अभिनेते अरुण गोविल यांच्या वहिनी होत्या. तबस्सुम यांनी अरुण गोविल यांचे भाऊ विजय गोविल यांच्या सोबत लग्न केले होते.

- Advertisement -

दरम्यान मागील वर्षी एप्रिलमध्ये तबस्सुम यांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला होता अशी अफवा पसरली होती. त्यांच्या निधनाच्या खोट्या अफवांवर त्यांनी उत्तर देताना इंस्टाग्रामवर म्हटले: मी पूर्णपणे बरी, निरोगी आणि माझ्या कुटुंबासोबत आहे. ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्या खोट्या आहेत. मी प्रार्थना करते की प्रत्येकजण निरोगी राहो.


हे ही वाचा –  ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -