घरमनोरंजनआता नृत्य दिग्दर्शक सलमानवरही गैरवर्तणुकीचा आरोप

आता नृत्य दिग्दर्शक सलमानवरही गैरवर्तणुकीचा आरोप

Subscribe

नृत्य दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून गाजलेल्या सलमान युसूफ खानवर गैरवर्तणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बॉलिवूडचा नामांकित नृत्य दिग्दर्शक आणि ‘डान्स इंडिया डान्स सिझन १’ या रियालिटी शोचा विजेता झालेला सलमान युसूफ खान याच्याविरोधात एफआयआर दाखल झाली आहे. एका मॉडेलने सलमानवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून त्याच्यावर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना अंधेरी, ओशिवरा येथील एका कॉफी शॉपमध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे.

कामाचे आमिष देऊन केले गैरवर्तन

या पीडित महिलेला सलमानने ओशिवरा येथील एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यास बोलवले होते. तिला सलमानने दुबईतील बॉलिवूड पार्कमध्ये त्याच्यासोबत नृत्य सादरीकरणासाठी विचारले. त्यांच्यातील संवाद संपल्यावर सलमानने तिला त्याच्या गाडीत बसण्यास सांगितले आणि गैरवर्तन केले असे, या पीडित महिलेने आरोपात म्हटले आहे.

- Advertisement -

विविध चित्रपटांमध्ये अभिनय

सलमान युसूफ खान हा नृत्य दिग्दर्शक आहेच तसेच तो अभिनेताही आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘एबीसीडी’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून त्याने पदार्पण केले. या चित्रपटातूनच सलमानचे बॉलिवूडमध्येही पदार्पण झाले. सलमाने ‘डार्लिंग’, ‘जीद’, ‘दिल जंगली’ आणि ‘वेलकाम टू न्यूयॉर्य’ या चित्रपटासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

#Metoo चळवळीचे शिकार 

गेल्या काही दिवसांपासून हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांवर लैगिंक शोषणाचे आरोप होत आहेत. सर्वप्रथम अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर आरोप केला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्यांवर आरोपांचा भडिमार झाला. मी टू या मोहिमेंतर्गक कित्येक सेलिब्रिटींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -