मनोरंजन जगतात मालिकांचे विशेष स्थान आहे. दैनंदिन जीवनातील विरंगुळा म्हणून प्रत्येक घरात कोणती ना कोणती मालिका पाहिली जाते. या मालिकांचे शूटिंग शेड्यूल्स फार मोठे असतात. त्यामुळे शेड्युलवरून अनेकदा प्रोडक्शन, निर्माते आणि कलाकारांमध्ये वादावादी होते. अशीच आणखी एक घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र, यावेळी निर्मात्यांनी अभिनेत्याला जबरदस्त चोप दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. लोकप्रिय मालिका ‘जय माँ लक्ष्मी’च्या सेटवर निर्मात्यांनी अभिनेत्याला मारहाण केल्याचे समजत आहे. हा अभिनेता कोण आहे आणि नेमकं काय घडलंय? याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (shaan mishra the famous actor was beaten by the producers)
टीव्ही मालिकेच्या सेटवर घडला प्रकार
‘जय माँ लक्ष्मी’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर निर्मात्यांनी अभिनेत्याला मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी अत्यंत किरकोळ वादातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे समजत आहे. निर्मात्यांनी मारहाण केल्याप्रकरणी अभिनेत्याने पोलिसात FIR दाखल केली आहे. मारहाण झालेल्या अभिनेत्याचे नाव शान मिश्रा असून तो टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा आहे. अभिनेता शान मिश्रा हा ‘जय माँ लक्ष्मी’ मालिकेत भगवान विष्णूंची भूमिका साकारत आहे. दरम्यान, मालिकेच्या शूटिंग सेटवर अभिनेता आणि निर्मात्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर रागाच्या भरात निर्मात्यांनी शानला मारहाण केल्याचे समजत आहे.
नेमकं काय घडलं?
अभिनेता शान मिश्राच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने मालिकेचे निर्माते मंगेश यांना शूटिंग लवकर संपवण्याची विनंती केली होती. हाताला दुखापत झाल्याने शानला डॉक्टरांनी शूटिंग न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, शूटिंगमध्ये ब्रेक पडू येऊ नये म्हणून तो सेटवर गेला होता. यावेळी त्याने लवकर घरी जाण्याची परवानगी मागितली. ज्यावरून निर्माते आणि अभिनेत्यामध्ये मोठा वाद झाला. हा वाद पुढे विकोपाला गेला. ज्यात निर्मात्यांनी अभिनेत्याला मारहाण केली.
निर्मात्याच्या पत्नीकडूनही अभिनेत्यावर हल्ला
शानने शूटिंग लवकर संपवण्याची विनंती केली असता निर्मात्याने सहमती दिली होती. पण त्यानंतर थोड्या वेळाने ही विनंती नाकारण्यात आली. ज्यावरून वाद झाला. यावेळी निर्माते मंगेश यांची पत्नीसुद्धा उपस्थित होती आणि वादात त्यांनीही सहभाग घेतला. टेली टॉकने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ आणि FIR चा फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निर्मात्याची पत्नी शानवर ओरडताना दिसते आहे. शिवाय त्याला काम पूर्ण कर असेही सांगतेय. तर निर्माता अभिनेत्याला मारताना दिसतोय. यावेळी निर्मात्याच्या पत्नीनेही अभिनेत्यावर हल्ला केल्याचं अहवालात म्हटलं आहे.
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
या व्हायरल व्हिडिओत निर्मात्याची पत्नी अभिनेत्यावर ओरडताना दिसतेय. ती म्हणतेय, ‘तुला जे करायचं ते कर. आधी तुझं काम पूर्ण कर आणि मग निघ. तू मला काय दाखवणार? तू इथे रोज येतो आणि टाईमपास करून जातो.’ यावेळी अभिनेत्याने ही सर्व घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
View this post on Instagram
टीव्ही अभिनेता शान मिश्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘गंदी बात’, ‘निकी और जुदाई बबल’, ‘लव्हपंती’सारख्या मालिका आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा एक ओळखीचा चेहरा आहे.
हेही पाहा –
Chhava : सिनेमॅटिक लिबर्टीला मर्यादा असावी, छावा सिनेमावर काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
Edited By – Vishakha Mahadik