एकदा हा चित्रपट सेंट्रल बोर्ड… शबाना आझमी यांनी केलं ‘द केरळ स्टोरी’चे समर्थन

बहुचर्चित ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी निषेध करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. दरम्यान, अशातच अभिनेत्री शबाना आझमी ‘द केरळ स्टोरी’च्या समर्थनार्थ समोर आली आहेत.

शबाना आझमी यांनी केलं ‘ द केरळ स्टोरी’चे समर्थन

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना यांनी ‘द केरळ स्टोरी’चे समर्थन करत एक ट्वीट शेअर केले ज्यात त्यांनी लिहिलंय की, “जे केरळ स्टोरीवर बंदी घालण्याची चर्चा करतात ते आमीर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’वर बंदी घालू पाहणाऱ्यांइतकेच चुकीचे आहेत. एकदा हा चित्रपट सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पास केला की कोणाला अतिरिक्त घटनात्मक अधिकार बनण्याचा अधिकार नाही.” असं त्या म्हणाल्या.

सत्यकथेवर आधारित चित्रपट

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 


हेही वाचा :

10 दिवसांच्या मेडिटेशन कोर्ससाठी नेपाळमध्ये पोहोचला आमीर खान