घरमनोरंजनShah Rukh आर्यन खानने लाँच केला स्वत:चा क्लोथिंग ब्रॅण्ड, पाहा व्हिडीओ

Shah Rukh आर्यन खानने लाँच केला स्वत:चा क्लोथिंग ब्रॅण्ड, पाहा व्हिडीओ

Subscribe

शाहरुखचा मुलगा आर्यन य़ाने मात्र आई गौरी खान हिच्याप्रमाणे बिझनेस क्षेत्रात एन्ट्री केली आहे.

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात एन्ट्री करण्याची तयारी करत आहे. तर शाहरुखचा मुलगा आर्यन य़ाने मात्र आई गौरी खान हिच्याप्रमाणे बिझनेस क्षेत्रात एन्ट्री केली आहे. आर्यनने स्वत:चा क्लोथिंग ब्रॅण्ड लाँच केला आहे. त्याचा टीजरही त्याने सोशल मीडियावर शे्अर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी आर्यनने त्याचा एका स्क्रिप्ट बरोबरचा फोटो शेअर केला होता. या फोटोतून अभिनय क्षेत्र नाही तर दिग्दर्शन क्षेत्रात आपण काम करणार असल्याचे संकेतच त्याने फोटोतून दिले होते. त्यानंतर आर्यनने त्याच्या क्लोथिंग ब्रॅण्डचा व्हिडीओ शेअर केला आहे. D’Yavol असे या ब्रॅण्डचे नाव आहे. टीझरमध्ये हा लग्जरी स्ट्रीट वेअर ब्रॅड असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी आर्यनने स्वत:ला नाही तर शाहरुखला पसंती दिली आहे. या टिझरमध्ये किंग खान टाईमलेस शब्द ब्लॅकबोर्डवरून पुसत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर जमिनीवर पडलेला पेंट ब्रश उचलताना शाहरुख दिसतोय. लेबल लाँच नंतर शेवटी शाहरुखच्या चेहऱ्याची एक झलक चाहत्यांना दिसतेय.

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आर्यन खानने कॅप्शन लिहली आहे. त्यात ‘ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVW_YZ 24 तासांनंतर X येथे D’Yavol असेल त्याला फॉलो करा असे लिहले आहे. शाहरुखनेही हा टिझर शेअर केला असून मंगळवारी लाँच होणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -