बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा जानेवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘जवान’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. जो सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ 8 दिवस झाले असून या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. याच निमित्ताने शाहरुखने आपल्या सहकलाकारांसोबत ‘जवान’ चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो दीपिका पदुकोणसोबत डान्स करताना दिसत आहे.
शाहरुख आणि दीपिकाचा जबरदस्त डान्स
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि दीपिका स्टेजवर येऊन त्यांच्या ‘जवान’ चित्रपटातील चलेया गाण्यावर नाचताना दिसत आहेत. दोन्ही कलाकारांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चाहत्यांच्या भन्नाट कमेंट
शाहरुख खान आणि दीपिकाचा डान्स चाहत्यांना आवडला असून ते अनेक कमेंट्सही करत आहेत. कमेंट्स करताना एका चाहत्याने लिहिलंय की, ‘किंग ऑफ रोमान्स’ तर दुसऱ्याने लिहिलंय की, ‘SRK तरुण होत आहे.’ तर तिसऱ्याने लिहिलंय की, ‘रियल हिरो एसआरके.
दीपिका आणि शाहरुख ‘या’ चित्रपटामध्ये दिसले एकत्र
दीपिकाने शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटात छोटी भूमिका साकारली आहे. ‘जवान’ चित्रपटापूर्वी शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने ‘पठाण’, ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ या चित्रपटात काम केले आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.ॉ