Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनशाहरुखने मारली चाहत्याला मिठी; व्हिडीओ व्हायरल

शाहरुखने मारली चाहत्याला मिठी; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. शाहरुखला पाहण्यासाठी अनेकजण दररोज त्याच्या घराबाहेर थांबून त्याची वाट पाहत असतात. सध्या शाहरुख त्याच्या ‘डंकी ‘ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचं चित्रपटाच्या प्रमोशनचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये शाहरुखचा चाहता शाहरुखला भेटताना दिसत आहे.

शाहरुखने मारली चाहत्याला मिठी व्हिडीओ व्हायरल

 

View this post on Instagram

 

A post shared by SRK VIBE (@_srkvibe2.0)

‘डंकी ‘ चित्रपटाच्या प्रमोशनचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ज्यामध्ये शाहरुखचा चाहता शाहरुखला भेटताना दिसत आहे. यादरम्यान, शाहरुख खान त्याच्या खांद्यावर हात ठेवतो हे पाहून फॅन थरथरू लागतो. त्यानंतर शाहरुख त्याला मिठी मारतो. शिवाय त्याच्यासोबत अनेक फोटो देखील काढतो. शाहरुखची ही आपुलकी पाहून या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

शाहरुखने जिंकली चाहत्यांची मने

शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून यावर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत लोक शाहरुख खानचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलंय की, “आजपासून तुमच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे”. याशिवाय दुसऱ्या युजरने सांगितलं की, “जर आम्ही किंग खानला भेटलो असतो तर आमचीही अशीच अवस्था झाली असती.”

हिट ठरला शाहरुखचा ‘डंकी’

21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेला शाहरुखचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी हे मुख्य भूमिकेत होते.


हेही वाचा : झीनत अमानचा सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -