Shah Rukh Khan आणि Nayanthara च्या नव्या चित्रपटाचे ‘हे’ नाव करण्यात आले फायनल

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान आता लवकरच त्याचे जबरदस्त चित्रपट घेऊन येणार आहे. ‘डंकी’ आणि ‘पठाननंतर’ शाहरूखने नव्या प्रोजेक्टसाठी टॉलिवूडचे दिग्दर्शक एटली कुमार यांच्यासोबत हात मिळवणी केली होती. दरम्यान, याबाबत आता नवीन अपडेट समोर येत आहे. याआधी या चित्रपटाचे नाव फाइनल झाले नव्हते, मात्र आता चित्रपटाचे नाव समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरूख खान आणि एटली कुमारच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जवान’ असे आहे. निर्माते लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा करणार आहेत. तसेच या चित्रपटात शाहरूख टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा सोबत दिसणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, खूप दिवसानंतर शाहरूख खान आणि एटली कुमारच्या चित्रपटाला एक उत्तम नाव मिळाले आहे. ज्याचे नाव ‘जवान’असे आहे. हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार असून या चित्रपटात शाहरूख आणि नयनताराचा रोमांस पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे नाव ‘लायन’ असे सांगण्यात येत होते. चित्रपटाच्या नावाबाबत टॉलिवूडच्या विजयबालनने ट्विटरवर एक डॉक्यूमेंट शेअर केले होते, ज्यात या चित्रपटाचे लायन असे नाव लिहिण्यात आले होते. मात्र अजूनही शाहरूखने चित्रपटाच्या नावाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

25 दिवसांनंतर फायनल झालं नाव?
सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते एका जबरदस्त टीझर सोबत चित्रपटाचे नाव घोषित करणार आहेत. हा टीझर 1 मिनीट 34 सेकेंदाचा असणार आहे. सूत्रांच्या मते, जवळपास 25 शीर्षकांतील एकाचा विचार करून जवान हे नाव फायनल केले आहे.

शाहरूख करून सल्ला घेऊन खुश आहे एटली
गेल्या काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली होती की, ‘जवान’ चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल करण्यास सांगितले. दिग्दर्शकांनी शाहरूखच्या सल्ल्याची अंमलबजावणी करत आपण शाहरूखच्या सल्ल्याने खूश असल्याचे सांगितले.

 


हेही वाचा :http://‘व्हॅक्यूम क्लीनर’ नाटकादरम्यान रंगणार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सत्कार सोहळा