घर मनोरंजन जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये शाहरुखसह एसएस राजामौलींच्या नावाचाही समावेश

जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये शाहरुखसह एसएस राजामौलींच्या नावाचाही समावेश

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे जगभरात लाखो चाहते आहेत. शाहरुख विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. नुकतीच टाइम मासिकाकडून जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत अभिनेता शाहरुख खानच्या नावाचा देखील समावेश आहे. शाहरुखसोबतच चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौलीच्या नावाचाही समावेश आहे. तसेच या यादीत शाहरुख खानसह पेड्रो पास्कल आणि जेनिफर कूलिजसारख्या कलाकारांना स्थान मिळाले आहे. लेखक सलमान रश्दी आणि टीव्ही होस्ट आणि न्यायाधीश पद्मलक्ष्मी यांच्याशिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, किंग चार्ल्स, स्टार आयकॉन बेला हदीद, ट्विटरचे नवीन मालक एलोन मस्क, प्रतिष्ठित गायिका बियॉन्से यांचीही नावे आहेत.

शाहरुखच्या यशात आणखी एक मानाचा तुरा

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

टाईम मासिकाने शाहरुख खानचा वार्षिक 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या कव्हरसाठी आयकॉनच्या यादीत समावेश केला होता, ज्यात गेल्या वर्षी रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या फोटोंसह. नुकतीच शाहरुखसोबत ‘पठाण’ चित्रपटात दिसलेली दीपिका पदुकोणने त्याचे अभिनंदन करणारी एक गोड नोट शेअर केली आहे.

- Advertisement -

यात दीपिकाने लिहिलंय की, “शाहरुख खानसोबत झालेली पहिली भेटमी कधीच विसरणार नाही. मी नुकतीच एक सुटकेस आणि एक स्वप्न घेऊन बंगळुरूहून मुंबईला आले होते. मी त्याच्या घरी बसले होते! मला एक भूमिका मिळाली. जी त्याच्यासोबत होती. त्या गोष्टी 16 वर्षे झाली. आमच्या नात्याला जे खास बनवते ते म्हणजे एकमेकांबद्दल असलेले प्रेम, विश्वास आणि आदर. शाहरुख खान कायमचा एक महान अभिनेता म्हणून ओळखला जाईल.”

 


- Advertisement -

हेही वाचा :

Sherlyn Chopra ची पोलिसात धाव, फायनान्सरच्या विरोधात वियनभंगाचा गुन्हा दाखल

- Advertisment -