HomeमनोरंजनShah Rukh Khan : इंस्टाग्रामवर SRK ला इन्फ्लुएंसरकडून धोबीपछाड, नेमकं प्रकरण काय?

Shah Rukh Khan : इंस्टाग्रामवर SRK ला इन्फ्लुएंसरकडून धोबीपछाड, नेमकं प्रकरण काय?

Subscribe

बॉलीवूडचा बादशाह म्हणजेच अभिनेता शाहरुख खान. जो कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी आगामी सिनेमा तर कधी खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे त्याच्याबद्दल सतत बोललं जातं. गेली कित्येक वर्षे तो बॉलिवूड सिनेविश्वातील चमचमत्या ताऱ्यांच्या यादीत बैठक मांडून बसला आहे. त्यामुळे साहजिकच त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. शाहरुख खान सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. ज्याच्या माध्यमातून तो विविध पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो.

दरम्यान, सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी मोठी आहे. असे असूनही इंस्टाग्रामवर मात्र वेगळे चित्र दिसत आहे. एका इन्फ्लूएंसरने फॉलोवर्सच्या बाबतीत चक्क बॉलिवूडच्या बादशाहला धोबीपछाड दिलाय. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

‘या’ इन्फ्लूएंसरसमोर SRK ची हवा फिकी :

दिवसागणिक सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मराठी असो वा बॉलिवूड, टॉलिवूड सगळे सेलिब्रिटी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. न केवळ कलाकार तर नेतेमंडळीसुद्धा सोशल मीडियाचा वापर करतात. आजचं जग आधुनिक असल्याचा परिणाम म्हटलं तरी चालेल. पण सोशल मीडिया जणू काळाची गरज झाली आहे. या माध्यमातून बरेच लोक आपले विचार आणि मत प्रकट करताना दिसतात. तर बरेच लोक रिल्स करणे आणि पाहणे यातच व्यस्त असतात. म्हणूनच गेल्या काही काळात रिल्स स्टार्सची मोठी डिमांड आली आहे. यापैकी एक म्हणजे जन्नत झुबेर.

टिकटॉकच्या माध्यमातून चर्चेत आलेली जन्नत झुबेर पुढे इंस्टाग्रामवर विविध आशयाचे व्हिडीओ बनवून ती सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणून ओळखली जाऊ लागली. आज जन्नतला इंस्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या ४९.७ मिलियन इतकी आहे. तर गेली अनेक वर्ष सिनेविश्वात कार्यरत असलेल्या आणि बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरुख खानचे ४७.७ मिलियन इतके फॉलोवर्स आहेत. अर्थात जन्नतने बॉलिवूडच्या SRK ला तब्बल २ मिलियनने मागे टाकलंय.

कलाकारांपेक्षा जास्त रीलस्टार्सची चर्चा

गेल्या काही वर्षात कलाकारांपेक्षा जास्त रीलस्टार्स अधिक चर्चेत असल्याचा वारंवार प्रत्यय आला आहे. याविषयी बऱ्याच कलाकारांनी आपापली मते प्रकट केली आहेत. मध्यंतरी मालिकांमध्ये काम करण्यासाठी दिले जाणारे प्राधान्य आणि मानधन यावर बोलताना काही मराठी तसेच हिंदी कलाकारांनी खदखद व्यक्त केली आहे. ज्यात काहींनी सिनिऑरिटीचा मुद्दा देखील ठळक केला होता.

हेही वाचा : Rose Tea Benefits : चमकदार त्वचेपासून वेट लॉससाठी फायदेशीर रोझ टी


Edited By – Tanvi Gundaye