शाहरूख खानची बॉलिवूडमध्ये ३० वर्ष पूर्ण; याचेच औचित्य साधत ‘पठाण’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर

१९९२ मध्ये 'दीवाना' चित्रपटातून शाहरूखची एन्ट्री शाहरूख खानने सुरूवातीला एका 'फौजी' या टेलिव्हिजन शो मधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती

आजच्याच दिवशी अभिनेता शाहरूख खानने तीस वर्षांपूर्वी ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. या चित्रपटामुळे शाहरूख खानला नवी ओळख आणि प्रसिद्धी सुद्धा मिळाली. आज शाहरूख एकीकडे बॉलिवूडमधील तीस वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे, तर दुसरीकडे हिच योग्य संधी साधून त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा देखील करण्यात आली आहे. डेटसोबतच या चित्रपटाचा धमाकेदार लूक सुद्धा समोर आला आहे. शाहरूखने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा लूक शेअर केला आहे. ‘पठाण’चा लूक पाहून शाहरूखचा चाहता वर्ग खूप झाला आहे.

‘पठाण’मधील शाहरूखचा जबरदस्त लूक

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

‘पठाण’च्या टीझर पोस्टरमध्ये शाहरूख खानचा एकदम डॅशिंग लूक दिसत आहे. सोशल मीडियावर या लूकचं खूप कौतुक केलं जात आहे. या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये शाहरूखच्या हातात एक हत्यार दिसत आहे.

शाहरूख खानने केले बॉलिवूडमध्ये ३० वर्ष पूर्ण
‘पठाण’ हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला असून या चित्रपटात शाहरूख खान शिवाय अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम आणि डिंपल कपाडिया दिसणार आहेत. तसेच या चित्रपटात सलमान खान सुद्धा एका विशेष भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहरूखने ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग जवळपास आता पूर्ण केले आहे.

१९९२ मध्ये दीवाना चित्रपटातून शाहरूखची एन्ट्री
शाहरूख खानने सुरूवातीला एका ‘फौजी’ या टेलिव्हिजन शो मधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती, त्यानंतर पहिल्यांदा त्याने १९९२ मध्ये ‘दीवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर हळूहळू शाहरूखने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरूखचा ‘पठाण’ २५ जानेवारी २०२३ मध्ये रिलीज होणार असून या चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगू भाषेत सुद्धा रिलीज होणार आहे.

 


हेही वाचा :बिग बॉस मराठी फेम वीणा जगतापची ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत एन्ट्री