घरमनोरंजनPathan Teaser : 'उसने देश को ही धर्म मान लिया'; शाहरूखच्या 'पठाण'चा...

Pathan Teaser : ‘उसने देश को ही धर्म मान लिया’; शाहरूखच्या ‘पठाण’चा दमदार टीझर रिलीज

Subscribe

Pathan Teaser : उशिरा का होईना अखेर बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान बिग स्क्रीनवर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच शाहरूख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. शाहरूखने सोशल मीडियावर ‘पठाण’चा टीझर पोस्ट करत रिलीजची तारीख शेअर केली आहे. यातून चित्रपटातील शाहरूखच्या भूमिकेची एका लूकची छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरूखसह अभिनेत्री दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

पठाण चित्रपटाचा टीझर शेअर करत शाहरूखनने कॅप्शनमध्ये लिहिले की, मला माहिती आहे की टीझर शेअर करण्यास खूप उशीर झाला, पण ही तारीख लक्षात ठेवा, पठाणची वेळ आता सुरु होत आहे. 25 जानेवारी 2023 ला सिनेमागृहात भेटू. हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

- Advertisement -

या टीझरमच्या सुरुवातीलाच जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकाणे यांची एन्ट्री होते. यावेळी दोघं शाहरूख खानच्या पठाण या पात्राची ओळख करून देतात. यात जॉन अब्राहम म्हणतो की, आपल्या देशात आपण आपल्या धर्म किंवा जातीवरून नावं ठेवतो, पण यापैकी त्याच्याकडे काहीचं नव्हतं… तर पुढे दीपिका पादुकोण एन्ट्री घेत म्हणते की- एवढचं नाही तर त्याच्याकडे नाव ठेवणारचं कोणी नव्हतं, जर काही असेल तर फक्त हा देश होता, भारत.. .

- Advertisement -

यानंतर टीझरमध्ये शाहरूखची एन्ट्री होते. पांढऱ्या शर्टमध्ये आणि लांब केस अशा रावडी अंदाजात तो पुढे येतो, यावेळी तो देशावरील प्रेमाबद्दल बोलत असतो. ज्यामध्ये किंग खान म्हणतो की, हा आपला देश, आपला धर्म आहे आणि देशाचे रक्षण हे कर्म आहे. ज्यांचे नाव होत नाही त्याचे नाव धर्माबरोबर जोडले जाते. हे नाव का पडले? कसे पडले? साठी थोडी वाट पाहा, लवकरच भेटू पठाण…

ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटांमधील शाहरूख आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यामुळे पठाण या चित्रपटात या जोडीला पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यश राज फिल्मला 50 वर्ष पूर्ण होत असल्याने आनंद साजरा करण्यासाठी यश राज फिल्म्स् पठाण चित्रपट प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात पहिल्यांदाच शाहरूख आणि जॉन ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.


होळीनिमित्त Bigg Boss फेम करणार नवा धमाका; विशाल, विकास, मीनल, जय देणार सरप्राईज


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -