घरमनोरंजनVideo: टिकटॉकवरचा शाहरूख, अभिनय बघून तुम्हीही व्हाल कन्फ्यूज!

Video: टिकटॉकवरचा शाहरूख, अभिनय बघून तुम्हीही व्हाल कन्फ्यूज!

Subscribe

सोशल मीडियावरील नेटकरी त्याला 'टिकटॉकचा किंग खान शाहरुख' असे देखील म्हणतात. या इब्राहिम कादरीचे टिकटॉक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

टिकटॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी लोक बॉलिवूड स्टार्ससारखा अभिनय करतात तर कोणी मजेदार व्हिडीओ बनवून व्हायरल होण्याचा प्रयत्न करतात. मात्र असे काही लोक आहेत जे कलाकारांचा सेम टू सेम अभिनय करून लोकांची मनं देखील जिंकू शकतात. टिकटॉकवर बॉलिवूड सुपरस्टार्सचे डुप्लिकेट असणारे लोकं प्रसिद्ध देखील झाले आहेत. टिकटॉकवर सलमान खान, आमिर खान, सनी देओल आणि कतरिना कैफ सारख्या स्टार्सची डुप्लिकेट तुम्ही पाहिले असतील. शाहरुख खानचे ही अनेक डुप्लिकेट्स आहेत, परंतु त्यापैकी एक म्हणजे इब्राहिम कादरी. तो अगदी सेम टू सेम शाहरुख खानसारखा दिसतोय. सोशल मीडियावरील नेटकरी त्याला ‘टिकटॉकचा किंग खान शाहरुख’ असे देखील म्हणतात. या इब्राहिम कादरीचे टिकटॉक व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत.

@qadriibrahim

#chenniexpress #kingkhan #srk #qadriibrahim #shahrukhkhan #srkfan #dipikapadukon #bollywood

♬ original sound – qadriibrahim

- Advertisement -

टिकटॉकवर इब्राहिम कादरी फक्त शाहरुख खानवर व्हिडीओ बनवितो आणि त्याच्यासारख्या फिरत असतो. अनेकदा लोकांची शाहारूख खान म्हणून फसवणूकही झाली आहे. इब्राहिम कादरीने शाहरुख खानची स्टाईल अशा प्रकारे कॉपी केली आहे की, इंस्टाग्राम, टिकटॉकवर इब्राहिम कादरी एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. शाहरुख खानच्या या डूप्लिकेटला १० लाखाहून अधिक लोक फॉलो करतात.

@qadriibrahim

#raees #raeesdialogue #kingkhan #srk #qadriibrahim #srkfan #shahrukhkhan

♬ original sound – Qadri Ibrahim – Qadri Ibrahim

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये इब्राहिम रईस या चित्रपटातील शाहरुख खानचा डायलॉग त्याच शैलीत बोलताना दिसतोय. या व्हिडीओला आतापर्यंत २.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच २ लाखाहून अधिक लाईक्स आणि ४०० प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

@qadriibrahim

#josh #kingkhan #srk #qadriibrahim #shahrukhkhan #srkfan

♬ original sound – Qadri Ibrahim – Qadri Ibrahim


Video – शाहरूख खानच बेताल वागणं बघून नेटकरी हैराण!

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -