बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खानचं वय वाढत असलं तरीही त्याचा चार्मिंगपणा तरुण अभिनेत्यांनाही मागे टाकणारा आहे. त्यामुळे आजही त्याची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. यावर्षी अभिनेत्याचा 60 वा वाढदिवस आहे. पण, त्याला बघून त्याच्या वयाची साठी जवळ आहे असं म्हणणं कुणालाही जड जाईल. वयाच्या या टप्प्यातही त्याचा फिटनेस कमालीचा आहे. दरम्यान, दुबईत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल व्हिलेज इव्हेंटमध्ये अभिनेत्याने आपल्या वयाबाबत एक विधान केले आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्याच्या या विधानावर उपस्थितांनी शिट्ट्या वाजवल्या. तर काहींनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Shah Rukh Khan gave hint about upcoming film king)
SRK ने वयाबाबत केलेले विधान चर्चेत
अभिनेता शाहरुख खानने दुबईत ग्लोबल व्हिलेज इव्हेंटमध्ये हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्याने म्हटले, ‘आणखी एका वर्षात मी 60 वर्षांचा होईन. याचवर्षी. पण बघा तरी, मी अजून 30 वर्षांचाचं वाटतोय.’ अभिनेत्याच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी प्रतिक्रिया देत जोरदार टाळ्या वाजवल्या. सर्वत्र टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज घुमत असताना अभिनेत्याने आपल्या फ्लॅट बेलीवर (पोटावर) हात ठेवत स्वतःचे आकर्षक एब्स दाखवले. पुढे बोलताना त्याने म्हटले, ‘मी फक्त तुम्हाला एव्हढंच सांगू इच्छितो की मी काही गोष्टी विसरून जातो यार!’ यावेळी शाहरुखने प्रेक्षकांना त्याच्या आगामी सिनेमाची हिंटसुद्धा दिली आहे.
SRK says, ‘I am turning 60 this year, but damn, I look like 30,’ and we can’t disagree. He’s making age look irrelevant! 🔥@iamsrk @GlobalVillageAE @khaleejtimes #GlobalVillage #ShahRukhKhan #SRK #KingKhan #Dubai #DubaiGlobalVillage #SRKinDubai #King pic.twitter.com/HuEQDKLuIy
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 26, 2025
अभिनेत्याने दिले आगामी सिनेमाचे संकेत
अभिनेता शाहरुख खानने या इव्हेंटदरम्यान आपल्या आगामी सिनेमाचे संकेत देताना म्हटले, ‘मी फक्त या ठिकाणी शूटिंग करणार नाहीये. मी आता मुंबईमध्येसुद्धा याचे शूटिंग करणार आहे. जिथे काही दिवसांतच मी परत जाणार आहे. माझे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खूप कडक शिस्तीचे आहेत. ज्यांनी पठाण सिनेमा बनवला आहे. त्यांनी सांगितलंय, लोकांना फिल्मविषयी आणि त्यात तू साकारणाऱ्या भूमिकेविषयी अजिबात सांगू नकोस. त्यामुळे मी तुम्हाला त्याबद्दल फार माहिती देऊ शकत नाही. पण इतकं नक्की सांगू शकतो की, हा सिनेमा तुम्हाला मजा देणारा असेल’.
‘किंग’मध्ये SRK साकारणार किंग
शाहरुखने आपल्या आगामी सिनेमातून मजा येईल असे सांगत आणखी एक हिंट दिली. त्याने सांगितले, ‘मी खूप नावांचा वापर केला आहे. त्यामुळे आता आमच्याकडील नावे संपली आहेत. तर मग आता किंगमध्ये शाहरुख खान किंग झाला आहे’. यावरून त्याच्या आगामी सिनेमाचे नाव ‘किंग’ असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शाहरुख खानने त्याचा आगामी सिनेमा ‘बिल्लू’बाबत बोलताना चाहत्यांना आवर्जून सांगितलं, ‘स्त्रियांचा आदर, सन्मान केला पाहिजे.’
हेही पहा –
Mahakumbh 2025 : एका दिवसात कोणी संत होत नाही, बाबा रामदेवांचा ममता कुलकर्णीला टोला