बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा जलवा; किंग खानने असे मानले चाहत्यांचे आभार

Shah Rukh Khan greets fans from Mannats balcony after Pathaans success Watch video

बॉक्स ऑफिसवर किंग खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा जलवा आजही कायम आहे. या चित्रपटाने सुपरहिट, ब्लॉकबस्टरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पाचव्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 65 ते 70 कोटींचा बिझनेस केला आहे. तर एकूण कलेक्शनचा विचार केल्यास, या चित्रपटाने आत्तापर्यंत 290 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा विरोध झाला, त्याविरोधात बॉयकॉटचा ट्रेंड चालला, मात्र किंग खानच्या चाहत्यांनी सर्व विरोध झुगारून चित्रपटाला अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. चित्रपटगृहांमध्ये चाहते किंग खानच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचताना दिसतायतं. तर कुठे पोस्टर्स झळकवत शाहरुख खानवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. चित्रपटाला चाहत्यांकडून मिळालेल्या यशामुळे आणि प्रेमामुळे किंग खान भलताच खुश झाला आहे. यामुळे त्याने चाहत्यांचे खास आभार मानले आहेत.

किंग खानने रविवारी आपल्या मुंबईतील मन्नत या बंगल्याच्या बाल्कनीत येत चाहत्यांना स्पेशल सरप्राईज दिलं. शाहरुखने चक्क बाल्कनीत उभं राहून पठाण चित्रपटातील ‘झुम जो पठाण’ या गाण्यावर ठेका धरला. तर खाली उभ्या असलेल्या चाहत्यांचे त्याने फ्लाइंग किस करत आभार व्यक्त केले, यावेळी शाहरुख खान जबरदस्त आनंदात दिसला. त्याने आपली सिन्गेचर पोज देत चाहत्यांना देखील खूश केलं, यावेळी बंगल्यासमोर उभे असलेले किंग खानच्या चाहत्यांनी देखील त्याच्यासोबत डान्स केला.

किंग खानने चाहत्यांच्या मानलेल्या आभाराचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यात चाहते मन्नतबाहेर शाहरूख खानची एक झलक पाहून दिवाने झाल्याचे दिसले. चाहत्यांनी शाहरुख, शाहरुख ओरडत त्याच्या प्रत्येक कृतीला तितकीच दाद दिली. याचा व्हिडीओ शाहरुखने देखील त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजवर शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, ‘मेहमान नवाजी पठाण के घर पर.. शुक्रीया’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विरोधानंतरही पठाण सुपरहिट

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठा विरोध झाला. अनेकांनी या चित्रपटाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, असे असतानाही किंग खानच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अवघ्या पाच दिवसात हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. नुसताच सुपरहिट नाही तर त्याने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. या चित्रपटात दीपिका पदूकोन, जॉन अब्राहम, आणि सलमान खानसारखे तगडी स्टार कास्ट आहे. अॅक्शनचा मसाला असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यावरुन हा चित्रपट तूफान हिट झाला आणि अजून होतोय हे सिद्ध झालं आहे.


‘एकतर सेक्स विकतो किंवा शाहरुख खान’, नेहा धुपियाचं २० वर्षांपूर्वीचं ट्विट का होतंय व्हायरल?