शाहरुख खान ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी; ‘मन्नत’वर रंगली पार्टी

shah rukh khan honoured france highest civilian award mannat party
शाहरुख खान ठरला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचा मानकरी; 'मन्नत'वर रंगली पार्टी

बॉलिवूडचा किंग खान आणि 90 च्या शतकातील सुपरहिरो शाहरुख खान आजही अनेक कारणांसाठी चर्चेत असतो. यावेळी शाहरूख एका हायप्रोफाईल पार्टीमुळे चर्चेत आला आहे. अलीकडे शाहरूखनने त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ या बंगल्य़ावर काही देशांच्या राजदूतांसाठी एका हाय प्रोफाईल पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये फ्रान्स, कॅनडा आणि अन्य काही देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सोशल मीडियावर या ग्रँड पार्टीतील अनेक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात शाहरुख त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार करताना दिसतोय. तसेच त्यांच्यासोबत अनेक फोटो देखील काढताना दिसतोय.

कॅनडाचे भारतातील राजदूत Diedrah Kelly यांनी या पार्टीचे अनेक फोटो ट्विटवर शेअर केले आहेत. यावेळी Kelly यांनी मन्नतवर झालेल्या स्वागताचे तोंड भरून कौतुक केले आहे. यावर kelly यांनी लिहिले की, जगभरातील चाहत्यांना शाहरूख किती आवडतो याची मला जाणीव आहे. दरम्यान आमचं मन्नतवर प्रेमाने स्वागत केल्याबद्दल गौरी खान आणि शाहरुख खानचे मनापासून आभार… मला बॉलिवूड आणि कॅनडा फिल्म इंडस्ट्रीचा अभिमान आहे.. या इंडस्ट्रीमध्ये नवीन संधी निर्माण होतील अशी पेक्षा व्यक्त करते.

तर फ्रान्सचे भारतीय राजदूत जीन-मार्क सेरे-शार्लेट यांनीही शाहरुखसोबतचे फोटो शेअर केले. त्यांनी फोटो शेअर करत लिहिले की, “मुंबईमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये फ्रान्समधील प्रतिष्ठीत असा नागरी सन्मान the Légion d’Honneur, यासाठी बॉलिवूडमधील शाहरुख खान अगदी योग्य आहे. शाहरुखनं दिलेल्या पार्टीसाठी त्याचे मनापासून आभार!’ शाहरुखला हा सन्मान त्याने संपूर्ण जगामध्ये सांस्कृतिक विविधतेसाठी दिलेल्या योगदानासाठी दिला गेला. तुमच्या आदरातिथ्याबद्दल मी तुमचे मनापासून कौतुक करू इच्छितो.

दरम्यान @Quebec_India यांनी देखील शाहरुखच्या या पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘मुंबईतील काही भारतीय राजदूत आणि शाहरुख यांची एक छान संध्याकाळ… बॉलिवूड सुपरस्टारनं क्युबेक सिनेमा आणि तिथल्या अत्याधुनिक स्टुडिओंबद्दल चर्चा केली. हे आमंत्रण दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद शाहरुख खान.’

हा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुखनेही अतिशय आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला की, ‘आयुष्यामध्ये असे अनेक क्षण येतात. हे क्षण तुम्ही योग्य मार्गानं जात असल्याची खात्री देत असतात. माझ्या आयुष्यातील हा क्षण देखील असाच आहे. हा सन्मान मिळाल्यानं मी खूप आनंदात आहे.’

काही काळापूर्वी शाहरुखने सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्री बदेर बिन फरहान अलसौद यांचीही त्यांच्या घरी भेट घेतली होती . त्याचा पुढचा चित्रपट ‘पठाण’ पुढच्या वर्षी रिलीज होणार असला तरी काही प्रसिद्ध अभिनेत्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. त्याला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. त्याने अलीकडेच दिग्दर्शक राजकुमार हिराणीसोबतच्या ‘डंकी’ या त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


Oops मूमेंटमुळे दीपिका पदुकोण होतेय ट्रोल