Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अखेर प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी होणार शाहरुख खानचा Jawan चित्रपट प्रदर्शित

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी होणार शाहरुख खानचा Jawan चित्रपट प्रदर्शित

Subscribe

'या' दिवशी होणार प्रदर्शित शारुख खानचा आगामी चित्रपट जवान.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. अलीकडेच या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलून ती २ जून ते २५ ऑगस्ट या दरम्यान करण्यात आली होती. परंतू आता अखेर त्याची अंतिम रिलीज डेट समोर आली आहे.

शाहरुख खान आणि निर्माती गौरी खान यांनी ‘जवान’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आणि चित्रपटाची रिलीज डेटही शेअर केली. ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे यावर्षी दमदार पुनरागमन करणारा शाहरुख खान आता त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अशातच शाहरुख खानच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

Jawan - Shah Rukh Khan And Atlee's new movie powerful title revealed ? -  YouTubeशाहरुख खानने ‘जवान’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. मोशन पोस्टरमध्ये एका शूर सैनिकाचे चित्र दिसत आहे. चित्रपटाच्या निर्मात्या गौरी खानने देखील हेच पोस्टर शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होत आहे. आम्हाला याचा खूप आनंद होत आहे.

Shah Rukh Khan, Nayanthara start shooting for Atlee's next | Entertainment  News,The Indian Express

- Advertisement -

यासोबतच ‘जवान’ची खास गोष्ट म्हणजे त्याची स्टारकास्ट आहे. साऊथचा दिग्दर्शक अॅटली हा ‘जवान’ या चित्रपटामध्ये शाहरुख खानसोबत नयनताराला घेऊन येत आहे. नयनतारा आणि शाहरुख हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यासोबतच विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा ​​देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहेत. यासह अल्लू अर्जुन या चित्रपटात एक मोठे सरप्राईज आहे. तसेच अल्लू शाहरुख खानच्या चित्रपटातही कॅमिओ करताना दिसणार आहे.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -