घरमनोरंजनआकाश अंबानीच्या लग्नामधील व्हायरल व्हिडीओवरून शाहरुख खानला केलं जातंय ट्रोल...

आकाश अंबानीच्या लग्नामधील व्हायरल व्हिडीओवरून शाहरुख खानला केलं जातंय ट्रोल…

Subscribe

व्हायरल व्हिडिओ बाबत शाहरुखच्या फॅन्सने नाराजी व्यक्त केली आहे

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी याने श्लोका मेहताशी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली. आशिया खंडातील सर्वात महागडं लग्न म्हणून आकाश आणि श्लोकाचं लग्न मानल जात. अनेक दिग्गज रजकारणी मंडळी अंतराष्ट्रीय सेलिब्रिटी ची वर्दळ लग्नासमारंभात पाहायल मिळाली. अशातच दोघांच्या लग्नाचे प्रत्येक अपडेट माध्यमांवर प्रसारित करण्यात येत होते. इतकेच नाही तर या ग्रँड वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळेस बॉलिवूड मधील किंग म्हणजेच शाहरुख खान देखील दोघांच्या लग्नाला आवर्जून उपस्थित होता. अशातच आता किंग खानचा आकाश आणि श्लोकाच्या लग्नामधील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक चाहते शाहरुख च्या अवस्थेवर हसत आहेत.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओ मध्ये?
व्हायरल व्हिडिओ मध्ये सगळे पाहुणे मंडळी नाचताना दिसत आहेत. आकाश त्याची आई नीता अंबानी हिला नाचण्यासाठी घेऊन येतो आणि शाहरुखच्या कानात काहीतरी बोलतांना दिसतो यानंतर  शाहरुख तिथून निघून जातो आणि एका बाजूला जाऊन उभा राहतो. या व्हायरल व्हिडिओ बाबत शाहरुखच्या फॅन्सने नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी शाहरुखची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी तर शाहरुखला  ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

शाहरुख हा सोशल मीडियावर फसरा सक्रिय नसतो. तरीही त्याने केलेल्या प्रत्येक  पोस्टवर चाहते लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. सध्या चाहते शाहरुखच्या ‘पठाण’ या आगामी चित्रपटची आतुरतेने वाट पाहत आहे. अद्याप चित्रपटा बाबत कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाहीये.

- Advertisement -

हे हि वाचा – बिग बी यांना ‘अँग्री यंग मॅन’ ओळख देणाऱ्या ‘जंजीर’च्या लिड रोलबाबत धर्मेंद्र म्हणाले…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -