HomeमनोरंजनShah Rukh Khan : SRK ला राज्य सरकारकडून मन्नतसाठी मिळणार 9 कोटी...

Shah Rukh Khan : SRK ला राज्य सरकारकडून मन्नतसाठी मिळणार 9 कोटी रुपये, काय प्रकरण?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला त्याच्या 'मन्नत' या बंगल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 9 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शाहरूखची पत्नी गौरी खानने याचिका दाखल केली होती. 'मन्नत' बंगला ज्या जमिनीवर उभा आहे, त्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा दावा गौरी खानने तिच्या याचिकेत केला होता.

बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान त्याच्या कारकिर्दीइतकाचं वैयक्तिक आयुष्यामुळे कायम लाइमलाईटमध्ये असतो. त्याचा मुंबईतील वांद्रे स्थित ‘मन्नत’ हा बंगला तर जणू पर्यटन स्थळ आहे. मुंबई फिरायला येणारी व्यक्ती मन्नत पहायला जाणार नाही, असे होणे शक्य नाही. त्यामुळे शाहरुख खानचा ‘मन्नत’ हा बंगला प्रचंड फेमस आहे. नुकतीच त्याच्या या बंगल्याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या बंगल्यामुळे शाहरुख खानला महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 9 कोटी रुपये मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे? याविषयी जाणून घेऊया. (Shah Rukh Khan may get 9 crore from the state govt for mannat)

9 कोटीचे ‘मन्नत’ कनेक्शन

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला त्याच्या ‘मन्नत’ या बंगल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून तब्बल 9 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शाहरूखची पत्नी गौरी खानने याचिका दाखल केली होती. ‘मन्नत’ बंगला ज्या जमिनीवर उभा आहे, त्या जमिनीवर अतिरिक्त पैसे देण्यात आल्याचा दावा गौरी खानने तिच्या याचिकेत केला होता. ही याचिका महाराष्ट्र सरकारने मंजूर केल्यास त्यांना 9 कोटी रुपये दिले जातील. शाहरुखचा बंगला वांद्रे, पश्चिम येथे स्थित असून त्याच्या आणि पत्नी गौरीच्या नावावर आहे.

अत्यंत भव्य असा ‘मन्नत’ हा बंगला मोठ्या डौलात उभा आहे. हा बंगला राज्य सरकारने पूर्वीच्या मालकाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांनी आपल्या घरासाठी अर्थात ‘मन्नत’साठी अतिरिक्त मोबदला म्हणून मागितलेले पैसे दिल्यानंतर सरकारने या कराराला मंजुरी दिली. या मंजुरीनंतर पूर्वीच्या मालकाने शाहरुख खानला ही मालमत्ता विकली. 2,446 चौरस मीटरमध्ये पसरलेली ही मालमत्ता शाहरुख आणि गौरी खानच्या नावावर नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतरित केली होती.

शाहरुख आणि गौरीने या मालमत्तेची मार्च 2019 मध्ये रेडी रेकनर किमतीच्या 25% रक्कम भरली होती. जी एकूण 27.50 कोटी रुपये इतकी होती. त्यावेळी राज्य सरकारने कन्व्हर्जन फी मोजताना अनावधानाने चूक केल्याचे सप्टेंबर 2022 मध्ये अभिनेत्याच्या लक्षात आले. सरकारकडून जेव्हा कन्व्हर्जन फी मोजण्यात आली तेव्हा मालमत्तेच्या तुकड्यापेक्षा बंगल्याची किंमत गृहीत धरण्यात आली होती. याबाबत शाहरूखची पत्नी गौरीने जिल्हाधिकारी एमएसडी यांना पत्र लिहीत अतिरिक्त पेमेंट परत करण्याची मागणी केली होती. तिची ही याचिका आता लक्षात घेण्यात आली आहे आणि तिचा स्वीकार करण्याची शक्यता आहे. ज्यामुळे अतिरिक्त रक्कम 9 कोटी रुपये सरकारकडून त्यांना परत मिळू शकते.

हेही पहा –

Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यातील सुंदरी मोनालिसाची बॉलिवूडमध्ये एंट्री, मिळाली मोठ्या सिनेमाची ऑफर