मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’नंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) ‘द वॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, गिरीजा ओक हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरू असताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र शाहरुखच्या चाहत्यांनी विवेक अग्निहोत्रींच्या आरोपांचं खंडन करताना ठोस पुरावे दिले आहेत. (Shah Rukh Khan never bows Vivek Agnihotris allegations refuted by fans provided concrete evidence)
झाले असे की, ‘वॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एका ठिकाणी मुलाखत देताना बॉलिवूडमध्ये काम करत असलेल्या मुस्लिम कलाकारांविषयी भाष्य केलं. यावेळी त्यांनी शाहरूख खानचं नाव घेताना म्हटले की, बॉलिवूडमधील तीन प्रसिद्ध कलाकार हे मुस्लिम आहेत. त्यातील दोन जण हार्डकोर मुस्लिम आहेत. यावेळी त्यांनी शाहरूख खान हा कधीच नमस्कार करत नाही. तो फक्त सलाम सलाम असं करतो, असा आरोप केला. विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या आरोपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र विवेक अग्निहोत्रींच्या आरोपांनंतर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. याशिवाय विवेक अग्निहोत्रीचं आरोपांचं खंडन करताना काही ठोस पुरावे दिले आहेत.
नेटकऱ्यांनी म्हटले की, शाहरूख खान मुस्लिम असला तरी तो सर्व धर्मांचा आदर करतो. हे बऱ्याचदा पाहायला मिळालं आहे. विवेक अग्निहोत्री यांचे आरोप खोडून काढण्यासाठी नेटकऱ्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात शाहरूख खानचे नमस्कार करत असलेले अनेक व्हिडीओ आणि फोटो दिसत आहेत. ज्यात अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये शाहरूख मंचावर येताच हात जोडून उपस्थित चाहत्यांना नमस्कार करताना दिसत आहे.
अभिनेता शाहरूख खानचा ‘जवान’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विवेक अग्निहोत्रींनी काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या ‘जवान’ सिनेमाचं कौतुक केलं होतं. मात्र आता त्यांनी शाहरुखसंदर्भात वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. शाहरूख खानवर याआधीही अनेकदा मुस्लिम असल्यावरून टीका करण्यात आली आहे. पण शाहरूख सगळ्या धर्माचा आदर करतो हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. तो त्याच्या चाहत्यांना बऱ्याचदा हिंदू सणांच्या शुभेच्छा देताना दिसतो. याशिवाय ‘जवान’ प्रदर्शित होण्याआधी त्याने वैष्णवदेवीसह बालाजीचं दर्शन घेतलं होतं.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमी सर्व सण-समारंभ आनंदाने साजरे करतो. नुकतचं शाहरुखने मुंबईच्या लालबाग येथील लागबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी शाहरुखसोबत त्याचा मुलगा अबराम...
संपूर्ण देशभरात गणोशोत्सवाची धामधुम सुरु आहे. बॉलिवूड कलाकार देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाले...
सध्या सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या धुमधड्यात साजरा केला जात आहे. बाप्पाचे भक्त बाप्पाची मनोभावे पूजा-आराधना करताना दिसत आहे. अशातच, अंबानी कुटुंबीय देखील दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव मोठ्या...