शाहरुख आणि दीपिकाच्या चित्रपटाच्या सेटवर झाली हाणामारी

Shah Rukh Khan Pathan Director Siddharth Anand Massive Fight With Assistant On Set
शाहरुख आणि दीपिकाच्या चित्रपटाच्या सेटवर झाली हाणामारी

बॉलिवूड किंग खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) चा चित्रपट ‘पठान’ (Pathan) च्या सेटवर भांडण झाल्याचे समोर आले आहे. या भांडणामुळे ‘पठान’ सेटवरील शूटिंग काही वेळासाठी थांबवले आहे. दरम्यान ‘पठान’च्या सेटवर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Sidharth Anand) आणि एक असिस्टंटमध्ये भांडण झाली. भांडण इतकी वाढली की, त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. यामुळे पठानच्या सेटवर एक दिवसासाठी शूटिंग थांबवले गेले आहे. या घटनेबाबत ‘पठान’ चित्रपटाशी संबंधित सुत्राने सांगितले की, ‘एक असिस्टंट सेटवर विचित्र वागत होता. तसेच तो सिद्धार्थ आनंदचे ऐकतही नव्हता.’

सिद्धार्थ आनंद (Sidharth Anand) आणि असिस्टंटमध्ये झालेल्या भांडणांचा खुलासा करताना सुत्राने सांगितले की, ‘सिद्धार्थ सेटवर त्याच्या स्वभावासाठी ओळखला जातो. तो या जहाजचा कॅप्टन आहे आणि अशात त्यांना असे अजिबात आवडत नाही की, एक सहाय्यक कामादरम्यान विचित्र व्यवहार करत होता. त्यांची इच्छा होती की, कामादरम्यान सर्वांचे फोन दूर राहिले पाहिजे, पण असिस्टंट त्यांच्या कोणत्याही गोष्टींवर लक्ष्य दिले नाही. सिद्धार्थने काही दिवस त्या असिस्टंटचा स्वभाव झेलला आणि त्याचा सामना देखील केला. यामुळे दोघांमध्ये भांडणं झाली.’

सूत्राच्या माहितीनुसार, ‘ब्रेकनंतर शूटिंग पुन्हा सुरू होईल. दरम्यान तो असिस्टंट सतत सिद्धार्थला शिवगाळ करत होता आणि बाकी लोकांना त्यांच्याबद्दल वाईट सांगत होता. हे सर्व सिद्धार्थपर्यंत पोहोचले, ज्यामुळे सिद्धार्थला राग आला. तो बाहेर आला आणि त्याने त्या व्यक्तिला कानाखाली मारली. तेव्हा त्या समोर असलेल्या व्यक्तीने पण सिद्धार्थला कानाकाली मारली. यामुळे सेटवर हाणामारी सुरू झाली. याच गोष्टीमुळे शूटिंग एक दिवसासाठी बंद केले आहे. या असिस्टंटला कामावरून काढण्यात आले आहे.’


हेही वाचा – नोबित-शिजुकाचे झाले लग्न, चाहते झाले भावूक