घरताज्या घडामोडीनकारात्मकता पसरवण्याचं काम..., पठाणच्या वादात शाहरुखनं व्यक्त केली खंत

नकारात्मकता पसरवण्याचं काम…, पठाणच्या वादात शाहरुखनं व्यक्त केली खंत

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु पठाण हा सिनेमा मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. त्यावर शाहरुख खाननं हजारो चाहत्यांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

कोलकाता येथे झालेल्या 28 व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानने प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे. आपण सोशल मीडियाच्या एवढ्या आहारी गेलो आहोत की, त्यामुळे सद्सदविवेकबुद्धी हरवून बसलो आहोत. काही लोक सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. नकारात्मकतेचा परिणाम फूट आणि विध्वंस असाच असतो. सिनेमा हे समाज बदलण्याचे माध्यम आहे. तसेच जग काहीही करो. मी, तुम्ही आणि सकारात्मक लोक अजून जिवंत आहेत, असं शाहरुख खान म्हणाला. शाहरुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

- Advertisement -

अभिनेत्री दीपिका पदुकोणने गाण्यात घातलेले कपडे आक्षेपार्ह असल्याचं सांगितलं जात आहे. पठाण सिनेमामध्ये बिकिनी परिधान करुन जो डान्स केला आहे त्याची आता चर्चा सुरु झाली आहे. दीपिकानं भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्याची ओरड होत आहे. तसेच तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे.

- Advertisement -

दीपिका पदुकोणने गाण्यात घातलेले कपडे आक्षेपार्ह आहेत. चित्रपट निर्मात्यांनी हा सीन दुरुस्त करावा अशी आमची मागणी आहे. जर असे झाले नाही तर आम्ही मध्यप्रदेशात या चित्रपटावर बंदी घालण्याचा विचार करू, असा इशारा मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.

दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानच्या बोल्ड व्हिडिओनं सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. परंतु त्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील काही व्यक्तींनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावर शाहरुख खानने आपली प्रतिक्रिया देत चाहत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.


हेही वाचा : …त्यापेक्षा भुकेलेल्या माणसाला जेवण द्या; शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाला भाजपा नेत्याचा विरोध


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -