HomeमनोरंजनShah Rukh Khan : किंग खानची साऊथ स्टार्सना विनंती, म्हणाला - एव्हढ्या...

Shah Rukh Khan : किंग खानची साऊथ स्टार्सना विनंती, म्हणाला – एव्हढ्या फास्ट नाचू नका

Subscribe

अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. न केवळ देशात तर विदेशातही त्याचा चाहता वर्ग असल्यामुळे खऱ्या अर्थाने तो बॉलिवूडचा बादशाह आहे. टॉलिवूडचे सुपरस्टार थलपती विजय, सूर्या, महेश बाबू, रामचरण, अल्लू अर्जुन यांच्याशी एसआरकेची चांगली गट्टी आहे. या कलाकारांची प्रत्येकाची एक युनिक स्टाईल आहे. जी त्यांना इतरांपेक्षा हटके बनवते. या कलाकारांकडे किंग खानने एक विनंती केल्याचे समजत आहे. ही विनंती नेमकी काय आणि कशाबद्दल आहे? हे जाणून घेऊया.

बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोणतंही कारण पुरेसं असतं. न केवळ देशात तर विदेशातही त्याचा चाहता वर्ग असल्यामुळे खऱ्या अर्थाने तो बॉलिवूडचा बादशाह आहे. टॉलिवूडचे सुपरस्टार थलपती विजय, सूर्या, महेश बाबू, रामचरण, अल्लू अर्जुन यांच्याशी एसआरकेची चांगली गट्टी आहे. या कलाकारांची प्रत्येकाची एक युनिक स्टाईल आहे. जी त्यांना इतरांपेक्षा हटके बनवते. या कलाकारांकडे किंग खानने एक प्रांजळ विनंती केल्याचे समजत आहे. ही विनंती नेमकी काय आणि कशाबद्दल आहे? हे जाणून घेऊया. (Shah Rukh Khan requested south stars to not performed fast dance)

SRK ची टॉलिवूडच्या स्टार्सना विनंती

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी सिनेमा ‘किंग’मूळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलीकडेच त्याने दुबईतील ग्लोबल व्हिलेज इव्हेंटला हजेरी लावली होती. जिथे आगामी सिनेमाविषयी बोलताना त्याने अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. दरम्यान, अभिनेत्याने बोलताना टॉलिवूडच्या सिनेकलाकरांना एक विनंती केली आहे. ज्याविषयी जाणून घेताना तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

अभिनेत्याने म्हटले, ‘दक्षिण भारतात माझे अनेक मित्र आहेत. ज्यामध्ये अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण, यश, महेश बाबू, विजय थलपती, रजनिकांत सर, कमल हासन सर यांचा समावेश आहे. या प्रत्येकाला मी एक विनंती वजा आग्रह करू इच्छितो की, कृपया एव्हढ्या वेगवान पद्धतीने नाचू नका. मला तुमच्यासोबत मॅच करणं अवघड जातं’.

मित्रांनो, एव्हढ्या फास्ट नाचू नका

अभिनेता शाहरुख खानने दाक्षिणात्य कलाकारांना फास्ट न नाचण्याची विनंती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार यावेळी आपल्या मजेशीर अंदाजात बोलताना अभिनेत्याने म्हटले, ‘माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे. मित्रांनो कृपया एव्हढ्या फास्ट नाचू नका. इतक्या वेगात नाचणे बंद करा. यामुळे माझ्यासाठी तुमच्यासोबत टिकून राहणे अवघड होत आहे’. शाहरुखचे हे विनंतीपर विधान सोशल मीडियावर बरेच चर्चेत आले आहे.

‘किंग’ सिनेमात झळकणार बॉलिवूड किंग

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, आगामी काळात त्याचा ‘किंग’ हा सिनेमा येतोय. ज्याच्याविषयी स्वतः शाहरुखने दुबईच्या इव्हेंटमध्ये मोठी हिंट दिली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून त्याचे चित्रीकरण फेब्रुवारीत सुरु होणार असल्याचे अभिनेत्याने सांगितले. हा सिनेमा आधी सुजॉय घोष बनवणार होते. सिनेमाची स्क्रिप्टदेखील सुजॉय यांची आहे. माहितीनुसार, ‘किंग’ या आगामी सिनेमात शाहरुखसोबत त्याची लेक सुहाना खान स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शिवाय अभिषेक बच्चन आणि अभय वर्मादेखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.