घरताज्या घडामोडीCruise Drug Case: शाहरुखने आर्यनला साडे चार हजाराची पाठवली मनीऑर्डर

Cruise Drug Case: शाहरुखने आर्यनला साडे चार हजाराची पाठवली मनीऑर्डर

Subscribe

१० मिनिटे शाहरुख, गौरी बोलले आर्यनसोबत

आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यनला गुरुवारी वडील शाहरुख खान यांच्याकडून आलेली साडे चार हजार रुपयाची मनीऑर्डर प्राप्त झाली आहे. आर्यनला तुरुंगातील कँटीनमध्ये खर्च करण्यासाठी ही रक्कम पाठवण्यात आलेली असून या रकमेतून आर्यन स्वतःला गरजेच्या वस्तू तुरुंग कँटीनमधून खरेदी करू शकतो. मनी ऑर्डर मिळाल्याची माहिती स्वतः आर्थर रोड तुरुंग अधिक्षक नितीन वायचल यांनी दिली आहे. तसेच शुक्रवारी आर्यनने तुरुंगातून व्हिडीओ कॉलद्वारे १० मिनिटे आई वडिलांशी बोलणे केले यावेळी आई गौरी आणि वडील शाहरुख खान याने त्याला दिलासा देत स्वतःची काळजी घे असा सल्ला दिला आहे.

एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अटक करण्यात आली होती. सध्या ८ जणांपैकी आर्यन खान आणि इतर ५ जण आर्थर रोड तुरुंगात असून दोघीजणी भायखळा येथील महिला कारागृहात आहेत. किल्ला न्यायालयाने आर्यन खान यांच्यासह तिघांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर तिघांच्या वकिलांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर दोन दिवस सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलाच्या युक्तिवाद न्यायालयाने एकूण घेत याच्यावरही निर्णय राखून ठेवत २० ऑक्टोबर रोजी जामिनावर सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

मागील काही दिवस आर्थर रोड तुरुंगातील विलगीकरण सेलमध्ये काढल्यानंतर आर्यन खान याची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर ती निगेटिव्ह आली. दरम्यान आर्यनला इतर कैद्यासारखे सामान्य बॅरेकमध्ये ठेवण्यात आले आहे. आर्यन खान याला तुरुंगात काही वस्तूची गरज असल्यामुळे त्याला त्या वस्तू तुरुंगातील कँटिनमधून खरेदी कराव्या लागतील यासाठी त्याने वडील शाहरुख खान यांच्याकडे पैशासाठी निरोप पाठवला होता. मात्र तुरुंगाच्या नियमाप्रमाणे एका कैद्याला खर्चासाठी केवळ साडे चार हजार रुपयाची रक्कम मिळू शकते, ती रक्कम देखील पोस्टाने मनी ऑर्डर च्या स्वरूपात स्वीकारली जात असल्यामुळे शाहरुख खान याने आर्यन खान ला तुरुंगात खर्चासाठी पाठवलेली ४.५  हजार रुपयाची मनिऑर्डर गुरुवारी तुरुंग प्रशासनाकडे आर्यनच्या नावाने प्राप्त झाली आहे.

तसेच शुक्रवारी आर्यन खान याने व्हिडीओ कॉलीद्वारे आई गौरी आणि वडील शाहरुख याच्यासोबत १० मिनिटे बोलणे झाले. या दरम्यान आर्यनला शाहरुखने धीर देत त्याला स्वतःची काळजी घे असा सल्ला दिला असल्याचे समजते. व्हिडीओ कॉलिंगच्या दरम्यान तिघेही भावूक झाले होते, आर्यन हा वडिलांशी बोलताना सतत डोळ्यातून अश्रू गाळत होता अशी माहिती सूत्रांची दिली आहे. कोरोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाइकांना बंदी असल्यामुळे तुरुंग प्रशासनाने नातेवाईकांशी बोलण्यासाठी तुरुंगात व्हिडीओ कॉलिंग सुरु केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Aryan Khan : एनसीबीने आर्यनला ‘सुपरस्टार’ बनवले, राम गोपाल वर्मांची समर्थनार्थ पोस्ट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -