बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या सिनेमामुळे चर्चेत असतो. पण आता तो कोणत्याही सिनेमामुळे चर्चेत नसून ‘आयपीएल 2024’मुळे (IPL 2024) चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrise Hydrabad) हा सामना पाहायला किंग खान स्टेडियममध्ये गेला होता. या सामन्यादरम्यानचा शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख धूम्रपान करत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.या व्हिडीओमध्ये शाहरुख धूम्रपान करत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान व्हीआयपी बॉक्समध्ये क्रिकेट सामना पाहताना दिसत आहे. यावेळी किंग खानसोबत आणखी काही लोकदेखील दिसत आहेत. दरम्यान किंग खान सिगारेट ओढत असल्याचं पाहायला मिळत आहे. शाहरुखला धूम्रपान करताना पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एकीकडे नेटकरी त्याला ट्रोल करत असताना दुसरीकडे चाहते मात्र त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. अशातच आता ईडन गार्डन्समधील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धूम्रमान केल्याने बंगाल क्रिकेट असोसिएशनने अॅक्शन घ्यायला हवी, असं नेटकरी म्हणत आहेत. अद्याप किंग खानने यासंदर्भात काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.आता शाहरुखवर कारवाई होणार का हे पाहावे लागेल.
srk is smoking 🚭 in the stadium #KKRvsSRH pic.twitter.com/YPfr8ISDsF
— Yasir dar (@yaasir_hameed) March 23, 2024
आयपीएलमधल्या वादांशी शाहरुखच जुन नात
आययपीएलमधल्या वादांशी शाहरुख खानच जुन नात आहे. आयपीएल सामना सुरु असताना, स्टेडियममध्ये सिगारेट पिण्याची त्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी 2012 च्या सीजनमध्येही शाहरुख स्टेडियममध्ये सिगारेट पिताना दिसला होता. त्यावेळी जयपूरच सवाई मानसिंह स्टेडियम होतं. या प्रकरणी जयपूरच्या लोकल कोर्टात त्याच्याविरोधात केस दाखल झाली होती. त्याशिवाय मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंड स्टाफसोबत वाद घातल्यामुळे अनेक वर्ष स्टेडियममधील त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती.