‘पठाण’, ‘लायन’नंतर शाहरूख खानने सुरू केले ‘या’ चित्रपटाचे शूट

shah rukh khan started shooting for rajkummar hirani movie starring taapsee pannu vicky kaushal after lion and pathaan as per reports
'पठाण', 'लायन'नंतर शाहरूख खानने सुरू केले 'या' चित्रपटाचे शूट

2018 मध्ये रिलीज झालेल्या बॉलिवूडच्या ‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुख खान अद्याप बिग स्क्रीनवर झळकला नाही. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चाहत्यांना ‘किंग खान’च्या कमबॅकची प्रतीक्षा होती, अखेर ती इच्छा आता लवकरचं पूर्ण होणार आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने पठाण चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. मीडिया रिपोर्ट्सनंतर, शाहरुखने ‘पठाण’नंतर डायरेक्टर अॅटलीचा ‘लॉयन’ चित्रपट पूर्ण केला आणि आता त्याने तिसऱ्या चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू केले आहे. शाहरुखच्या या चित्रपटात त्याच्यासोबत तापसी पन्नू झळकणार आहे.

शाहरुख खान पहिल्यांदा सिद्धार्थ आनंदच्या पठाण चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान जोरदार अॅक्शन स्टाईलमध्ये दिसणार आहे. पठाणनंतर शाहरुख खान दिग्दर्शक अॅटलीच्या ‘लायन’ या चित्रपटात दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात शाहरुखसोबत नयनतारा आणि सान्या मल्होत्रा ​दिसणार आहेत. त्याचबरोबर या दोन चित्रपटांनंतर शाहरुख खानचा राजकुमार हिरानीचा तिसरा चित्रपट आहे, जो सोशल कॉमेडी असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानने 15 एप्रिल रोजी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. चित्रपटाच्या शूटिंगला २ आठवडे लागणार असून त्यासाठी पंजाबचा सेट मुंबईतच बनवण्यात आला आहे. मुंबईच्या शूटिंगनंतर या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण लंडन आणि बुडापेस्टमध्ये होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त बोमन इराणी, विकी कौशल आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

‘रिटर्न तिकीट’ असे या चित्रपटाचे नाव असल्याचे सांगितेल जात आहे, परंतु याबद्दल ठोसपणे काहीही सांगणे कठीण आहे. या चित्रपटात बोमन इराणी शाहरुखच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटातील तापसी आणि विकीच्या भूमिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी काही रिपोर्ट्समध्ये दोघे रोमँटिक अवतारात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतच्या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

यापूर्वी शाहरुखचा फोटो येताच तो ट्विटरवर ट्रेंड करू लागला. या फोटोमध्ये ‘पठाण’मध्ये तो शर्टलेस अंदाजात दिसला. यात त्याने 8 पॅक अॅब्स फ्लॉंट करताना दिसला. यावेळी त्याने कॅमेऱ्याच्या अपोजिट बाजूने पोज दिली आहे. यावेळी त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘शाहरुख जरा थांबला तर पठाणला कसे थांबवणार… मी अॅप्स आणि ऍब्स बनवणार आहे.’ त्याचे हे कॅप्शन डिस्ने प्लस हॉटस्टारच्या जाहिरात मोहिमेचा भाग आहे, ज्याची टॅगलाइन आहे, ‘थोडा रुक शाहरुख.’


KGF Chapter 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर ‘KGF 2’ चा धुमाकूळ, तिसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई